पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

TE केलें. त्यांची चौकशी पुढले फेब्रुअरी महिन्यांत झाली; आणि कर्नल डेस्पार्ड व दुसरे पांच यांवर चांगले दीवरून गुन्हा लागू होऊन त्यांस त्या महिन्याचे २१ वे तारिखेस फांशीं दिलें. पुढे उत्तरोत्तर बोनापार्ट याचा लोभ वाढत चालला, तो ग्रेट ब्रिटन देशांतील व्यापारास अडचण करूं लागला; व ब्रिटिश लोकांची फ्रान्स देशांत जिनगी होती, तीवर जुलूम करणे, वब्रिटिश लोकांचा इनसाफ न करणे, यांहीं- करून ब्रिटन देश आपले ताबेखालचा, असा भाव दाखवूं लागला. तहनाम्यावर सही झाली, हे दोनही राज्यांत कळल्यावर फ्रेंच यांनी हिंदुस्थानांत गलबतें धरली होतीं, तींही परत देईना. त्याने व्यापाराचे कामगार या नांवानें ग्रेट ब्रिटन व अयर्लंड एथें कित्येक फौजेंतील सरदार पा- ठवून हल्ला करण्यास उपयोगी माहीतगारी करणे ही दूरची मसलत केली. परंतु माल्टा बेटांतून ब्रिटिश यांनीं निघून जावें, या गोष्टीविषयों बोनापार्ट यानें तंटा आरंभिला. त्यामुळे फ्रेंच व इंग्लिश दरबारांत फार दिवस बोलणे चालत होतें; परंतु ते नीट जमेना, ह्मणून तारिख ८ माहे मार्च संन् १८०३, ते दिवशीं राजानें पार्लमेंट सभेस निरोप पाठ- विला कीं, सांप्रत फ्रान्स व हालंड एथे मोठी गलबतांची तयारी चालली आहे, ती बाहेरचे संस्थानांकरितां, असें जरी सांगतात, तथापि सांप्रत जे बोलणे चालले आहे त्या चा इत्यर्थ आझून कांहीं ठरला नाहीं, ह्मणून मी विशेष बंदोबस्त केला आहे, व सरकारची अबरू आणि प्रजांचें रक्षण यांस जितका अवश्य दिसेल तितका पुरावा तुझी