पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११५ सरकाराने जाणिलें; आणि ब्रिटिश सरकार माल्टा बेट स्वाधीन करीना, व स्विट्सर्लंड देशचे कारभारांत पडा- वयास त्याकडन यत्न होऊं लागला, या गोष्टी तह मोडाव- याच्या झाल्या, असें फ्रेंच सरकार ह्मणूं लागले. असे असतांही संन १८०३ चे मार्च महिन्यापर्यंत बा हेरून ब्रिटिश प्रधानांनीं कांहीं विरोध दाखविला नाहीं; परंतु गलबतें मात्र कांहीं नवीं तयार केलीं होतीं. पुढे बोनापार्ट व ब्रिटिश वकील या दोघांमध्ये तंट्याच्या गो ष्टीचा पक्का विचार ठरून शत्रूचें लक्ष्य पुरै ध्यानांत आले. इतक्यांत स्वदेशाचे रक्षणासाठी सरकारास बंदोबस्त करण्याचे प्रयोजन पडले. तें असें; सन १७९४ व ९५ या दोहों वर्षांत लोकांच्या मंडळ्या शत्रूंस जसे कागदपत्र पाठ- वीत असत, तशीच आतां एक मंडळी झाली, व तिचा मुख्य कर्नल डेस्पार्ड झाला. त्यानें पूर्वी मोठी सरका- रचाकरी बजाविली होती; परंतु कांहीं कारणामुळे तो संन् १७९७ त वंडांत शिरून स्थाफील्डस एथें कैद झाल होता. त्याने संन १८०२ त सुटल्यावर तीस लोकांची मंडळी मिळवून शिपाई व राजाचे रखवाली लोक फितूर करावे, व पार्लमेंट सभेचे बैठकीचे प्रारंभी राजाचा प्राण घ्यावा; इतक्यांत दुसरे मंडळीनें किला व मोठी पेढी घ्यावी, व डांकेच्या गाड्या बंद कराव्या, आणि त्या बंद झाल्या ही खूण पाहून लोकांनी चहूकडून उठावें; अशी मसलत केली. जरी सरकारास हें वर्तमान प्रथमच ठाऊक होतें; तथापि त्या लोकांचा गुन्हा पुरा होईपर्यंत चतुरपणानें वाट पाहून नवेंबर महिन्याचे १६ वे तारिखेस त्या बंडवाल्यांतून सुमारें तीस लोकांस सौथ लांबेध एथें एक ठिकाणी धरून कैद