पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ बरी या दोघांनी सह्या केल्या होत्या. त्या तहाचें बोलणें कांही महिनेपर्यंत फार गुप्तपणाने चालत असे.

माल्टा तो तह एमिया शहरी संन् १८०२ माहे मार्च ता- रिख २७ ते दिवशीं ठरला. तो असा. त्यांत त्रिनिदाद बेट व डच यांचे हिंदुस्थानचे दक्षिणेचें सिंहलद्वीप, या दोहों वांचून सर्व लढाईंत मिळालेला मुलूख ब्रिटिश सर काराने परत द्यावा. केप आफ गुडहोप हे अमानत ठेवून सर्वांनी त्याचा सारिखा उपभोग घ्यावा. बेटांतून ब्रिटिश फौजेने निघून जाऊन तें जिरुझिलम शहरांतील सेंट जान याचे नैट* यास द्यावें, इजिप्त देश तुर्क सरकारास परत द्यावा. पोर्टुगल एथील राज्य जसें आहे तसे असावें, व फ्रेंच फौजेनें रोम व नेप्स या प्रांतांतून निघून जावें. त्या तहांत सात बेटांचे संस्थानांची स्वतंत्रता फ्रेंच यांनी कबूल केली; आणि न्यूफौंडलांड एथील माशांचा व्यापार पहिले रीतीने स्थापिला. या तहापासून लोकांस फार संतोष झाला; व लढाईचा खर्च वांचला. दहा वर्षेपर्यंत इतकी लढाई झाली असतां इंग्लंड एथील राज्यरीति, कायदे, व धर्म, ही पूर्ववत् राहि- लीं, आणि व्यापार वाढला हीही लोकांस मोठी गोष्ट वा टली. परंतु असा तह झाला असतांही लवकरच ग्रेटव्रि- टन व फ्रान्स एथील सरकारांत पुनः द्वेष उत्पन्न झाला. बोनापार्ट व्यापाराचा तह होऊं देईना, त्यानें जर्मनी देश लुटला, स्विट्सर्लंड घेतलें, व इंग्लंड एथील छापा- ची स्वतंत्रता नाहीं अशी करावी असे मागणे केले; या गोष्टी पाहून ब्रिटिश तो पुनः लोभास प्रवृत्त झाला, असें, तुर्क लोकांची नेहमी लढाई करणारे या नांवाची मंडळी...