पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११३ पाल हा पुढे लवकरच मेला, त्यामुळे तो उत्तरेकडील रा ज्यांचा जमात्र अगदीं मोडला. इजिप्त देशांत सर राल्फ आबक्रबी यास बहुत फौज देऊन पाठविले; त्याने फार संकटे असतांही मार्च महिन्याचे ७ वे तारिखेस तेथें उतरून १३ वे तारिखेस आलेकसांदिया शहराजवळ फ्रेंच यांचे कांहीं फौजेशी लढाई करून तिचा अगदीं मोड केला. त्याच महिन्याचे २१ वे तारिखेस त्यानें फिरून आलेकसांद्रिया शहरा- हून सुमारे ४ मैल अंतरावर दुसरी लढाई केली, तीं- तही त्याचाच जय झाला; परंतु जखम लागल्यामुळे तो २८ वे तारिखेस मृत्यु पावला, हा मोठा नाश झाला. नंतर सरदाराचें काम जनरल हचिन्सन याजवळ आले, तोही आलेकसांद्रिया शहराजवळ शत्रूंची फौज होती तेथे गेला. त्यानें रोसटा किला व शहर हीं दोनही घे- तलीं. व तेथील रखवालदार फ्रेंच लोक यांनीं फारसा अटकाव केला नाहीं. मे महिन्याचे दुसरे तारिखेस ४००० ब्रिटिश लोक व तितके तुर्क लोक घेऊन तो कैरो शह- रावर गेला; व त्यानें शमानिए याजवळ फ्रेंच लोकांवर हला केल्यामुळे तो तेथें पोंचला. त्या ठिकाणी लोक ५००० वर होते. परंतु त्यांनी करार करून ते स्वाधीन केले. हा मोठा विजय लहानसे इंग्लिश फौजेने मिळ- विला; व त्यापासून सर्व इजिप्त देश इंग्लिश यांचे हस्त- गत झाला. ज्या दिवशी या विजयाची बातमी इंग्लंड एथें आली, त्या दिवशीं तहाचे मूळ कलमांवर फ्रेंच यांचा वकील ओटो साहेब, व ब्रिटिश राजाचा वकील लार्ड हाक्स-