पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ आरी महिन्याचे २२ वे तारिखेस एकीभूत राज्याचे पा र्लमेंट सभेची बैठक व्हावी, असा हुकूम झाला; तसाच राज्याच्या किताबांत, चिन्हांत, व निशाणांत फेरफार हो- ण्याविषयींही जाहीर नामा लागला. आतां अयर्लंड एथील रोमन क्याथोलिक लोकांस मोकळीक व्हावी, याविषयीं प्रधानांमध्ये कांहीं तंटा झाला; ह्मणून पिट साहेब व त्याचे मित्र यांनी आपली मोठी कामें सोडिली. नंतर कामन्स सर्भेतील पूर्वीचा स्पीकर आ डिग्तन साहेब यास मुख्य प्रधान व एक्सचेकर याचा चान्सेलर नेमिलें. लार्ड हाक्सबरी व पेल्हम यास सरकारचे सेक्रतारी नेमिलें; व कामन प्लीकोर्ट याचा पूर्वीचा मुख्य न्यायाधीश लार्ड एल्डन यास चान्सेलर नमिले. ि त्या वेळेस रशिया देशचा एंपरर पाल सर्व उत्तरेक- डील सरकारांस अनुकूळ करून बहुधा फ्रेंच यांस मिळा- ला होता; अशा समयीं चतुरपणानें ब्रिटिश सरकाराने मोठीं गलबतें सत्रा तयार करून त्यांवर सर हैड पार्कर व लार्ड नेल्सन हे सरदार नेमिले. ते दोघे मार्च महि- न्याचे १२ वे तारिखेस यामथ एथून निघून मोठे अव घड ठिकाण सौंड ते पार होऊन डेन्मार्क देशची राज- धानी कोपेनहेगेन् शहर एथें पोंचले, जरी डेन यांनी मोठी तयारी केली होती, तथापि लढाई निकराची होऊन त्यांची गलबतें अठरा गेलीं, व त्यांचे राजधानीस संकट प्राप्त झाले. अशा संधीस लार्ड नेल्सन यानें लढाई बंद करण्याचे बोलणे लाविलें, तें त्यांनी मान्य केलें; व एंपरर