पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाहेरचीं मोडावयाकरितां पैका खरचण्याचें प्रयोजन नाहीं. पार्लमेंट त्या समयीं कांहीं ऐकेना असे झाले. इ०स०१६४१ त्या समयी पार्लमेंट सभेची बुद्धि प्रजासत्ताक राज्य करावें अशी झाली, हें उघड दिसून आले; कारण ती सभा राजाचे अपराधांची चौकशी एकीकडे ठेवून राज्य- सत्ताक राज्यच बुडवावें असें इच्छू लागली. या मसलतींत जे मुख्य होते त्यांनीं प्रथम धर्मपक्ष मोडण्याचा उद्योग आरंभिला; कारण धर्मपक्षाचें रा- ज्यास मोठे बळ होतें. पार्लमेंट सभेच्या संमतीवांचून धर्मसंबंधी कायदे केले, हा अपराध ठेवून त्यांनी तेरा, धर्मा- ध्यक्षांस सरकार गुन्हेगार ठरविलें; आणि लार्ड सभेस भीड घातली कीं, तुमच्या सभेत जे धर्माध्यक्ष आहेत त्यांस काढून टाकावे. हा आपल्यास संकट समय येणार असे पाहून पूर्वीच धर्माध्यक्षांनी निश्चय केला कीं, आतां आपली लार्ड सभेतलीं स्थानें सोडून द्यावीं. यापासून राजाचा फार नाश झाला; परंतु पुढे राजानें आपले अविचारानें यापेक्षा अधिक करून घेतला. राजा चार्लस फार दिवसपर्यंत आपला राग आवरून कामन्स ह्मणतील तसें ऐकून त्यांस संतुष्ट करावे अशा प्रयत्नांत होता, परंतु जितकें जितकें आपण होय ह्मणावें तितका ते अधिकच आग्रह धरितात असे पाहून त्यास राग आटोपेना असा झाला. त्यानें आपला हर्बर्ट नामे आटनींजनरल होता, त्यास आज्ञा केली की, लार्ड सभेतील लार्ड किं- बोल्टन, ज्यावर लोकांची फार प्रीति होती; आणि का मन्स समेतील सर आर्थर हेस्लीग, हालिस, हाप्डन, पिम, आणि स्त्रोड; हे पांच गृहस्थ यांवर सरकार गुन्हे -