पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खेस आस्त्रियन यांचा मोठा मोड केला. परंतु जून महिन्याचे १४ वे तारिखेस मारेंगो एथें लढाई झाली, तीत प्रथम आस्त्रियन यांचा जय झाला, व आणखी कां- ही वेळ उभयपक्षींचे जय पराजय झाल्यावर शेवटी ते परा- जय पावले, व त्यांचे लोक बहुत मेले. फ्रेंच सांगत असत कीं, तींत तीन हजार मेले, पांच हजार जखमी झाले, व सात हजारांस धरून कैद केले. परंतु इंपीरियल ग्या- झेट वर्तमान पत्रांत आहे की, मेले, जखमी, व कैद केले मिळून एकंदर नऊ हजार एकुणहत्तर, त्यांतून पांच हजार दोनशे चवऱ्याहात्तर बंदिवान होते. या व दुसऱ्या फ्रेंच यांचें विजयामुळे जर्मनी एथील एंपरर याकडून कौंट सेंट जुलीन याने तहनाम्यावर सही करून दिली; परंतु तो तडीस गेला नाहीं. पुढे रशियन यांनी लढाई सोडिली, व दुसऱ्या कांहीं प्रतिकूळ गोष्टी घडल्या, त्यांमुळे दुसऱ्यानें लढाई बंद होण्याचा क रार एंपरर यानें केला, व त्याची कलमें पुढे ठरली. त्या वेळेस इंग्लिश यांचा हिंदुस्थानांतील जो मुख्य शत्रु टिपू, त्याची राजधानी श्रीरंगपट्टण यावर इंग्लिश सरदार जनरल हारिस यानें वेढा देऊन ते घेतलें; व त्या लढाईंत टिपू मारला गेला. यामुळे इजिप्त देशाच्या वाटेनें जाऊन त्यास मदत करावी, असे फ्रेंच यांच्या जें म नांत होते त्याची निराशा झाली. एप्रिल महिन्याचे २१ वे तारिखेस प्रधानांनीं उद्योग केल्यावरून पार्लमेंट सभेत विचार ठरला की, ग्रेट ब्रिटन व अयर्लंड हीं दोनही मिळून एकुणिसावे शतकाचे प्रारं भापासून एक राज्य करावें; व संन् १८०१ चे जान्यु- २६