पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०९ पूर्ण झाला. लोरियाँ ह्मणून एक फ्रेंच गलबत फार लढून शेवटी जळून उडून गेले. त्यावरचे लोकांतून थो डे वांचले. ती लढ़ाई मधून मधून सूर्योदयापर्यंत झाली; तींतून फ्रेंच यांची मोठी गलबतें दोन, व दोन फ्रिगेट इतकी मात्र बचावून गेली. त्या लढाईत ब्रिटिश यांचे सोळा सरदार व दोनशें दोन लोक मेले, आणि सहाशे सत्याहत्तर जखमी झाले. फ्रेंच यांचे यापेक्षा अधिक पडले. या विजयानंतर आड्मरल नेल्सन आलेक्सां द्विया शहरांतील बोनापार्ट याचे लोकांस वेढा घालण्या- करितां आपलीं कांहीं गलबते ठेवून आपण सिसिली वे टास निघून गेला. या मोठे विजयाचें वर्तमान ऐकून इंग्लंड देशांत फार संतोष झाला. त्या प्रसंगी लोकांनी राजास आनंद- पत्रे दिली; व आड्मरल यास लार्ड नेल्सन असा कि ताव मिळाला. तो विजय पाहून रशिया देशचा एंपरर तुर्क लोक व नेप्ल्स एथील राजा, यांस फ्रेंच यांशी लढाई करण्याची उमेद येऊन त्यांनी इटली देशांत व रैन न- नदीचे कांठावर कितीएक वेळ फ्रेंच यांचा पराजय के ला. प्रिन्स आफ आरंज यास पुनः जागेवर स्थापा- वयास ही संधि चांगली आहे, असे समजून ब्रिटिश सर- काराने मोठे अरमार देऊन ड्युक यार्क व आड्मरल मिचल यांस हालंड एथे पाठविलें. टेक्सेल नदीत डच यांची आठ गलबतें होती, त्यांचा ब्रिटिश आड़- मरल यानें मोड केला, व पुढे जात असतां ड्युक यानें आणखीही कित्येक विजय मिळविले; परंतु डच यांची नव्हती, व फ्रेंच इंग्लिश यांस मदत करण्याची इच्छा