पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ अकस्मात् दैववशात् आगस्ट महिन्याचे पहिले तारिखेस त्रि- द्विरा आड्मरल नेल्सन नाइल नदीचे संगमाजवळ आला, व फ्रेंच अरमार आबुकीर समुद्रांत नांगर टाकून रा- हिले आहे, असे त्याचे दृष्टीस पडलें. आइमरल हुए याचे गलबतांवर एकशे वीस तोफा व एक हजारांवर लोक होते; दुसरी तीन गलबतें एक एकावर ऐशीं तोफा, अशी होती, व चवन्याहत्तर तोफांची नऊ होतीं. तीं फ्रेंच यांची गलबतें कांठाजवळ लढाई करितां घट्ट व मजबूद रांग करून राहिली, त्यांचे बाजूवर चार फ्रिगेट व बहुत बंदुकांच्या होड्या ठेविल्या होत्या, व पुढे बंदोबस्ता- करितां एका लहान बेटावर मोरचा बांधिला होता. हे पाहून इंग्लिश आइमरल याची हल्ला करण्याची हिंमत खच- ली नाहीं. त्याने फ्रेंच यां इतकीच आपले मोठी गलब- तांची रांग बांधून तिला बळकटी येण्याकरितां एक पास तोफांचें गलवत ठेविलें होते; परंतु शत्रूजवळ जात असतां त्याचें कललोडन नावाचें एक चवन्याहत्तर तोफांचें गल- वत उथळ पाण्यांत जमीनीस लागल्यामुळे तेथून दुसरे दि वशीं सकाळपर्यंत निघालें नाहीं. आड्मरल नेल्सन याने मोठ्या युक्तीनें व शौर्यानें श- बूंची रांग फोडून त्यांचे अरमाराचे कांही भागास वेढा दिला. सूर्यास्ताचे सुमारें लढाईस आरंभ मोठ्या धीरानें झाला, आणि प्रारंभीच आड्मरल हुए यास दोन जख- मा लागल्या, आणि तो दुसऱ्या जागीं गेला, तेथें मेला. लढाई सुमारे दोन तास झाल्यावर फ्रेंच यांची दोन गल- बतें घेतलीं, तिसरें लवकरच लागून फुटले, आणि सर्व ढील बाजू इंग्लिश यांचे हस्तगत होऊन त्यांचा विजय