पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फ्रेंच जहाज डानिगाल याचे कांठावर आले, परंतु आ- लीकडील मोड झाला, त्याचें वर्तमान ऐकून परत गेलें. अक्टोबर महिन्याचें ११ वे तारिखेस आड्मरल वारन यास फ्रेंच यांचीं कांहीं गलबतें ऐरिश कांठावर दृष्टीस पडलीं, त्यांशी त्यानें दुसरे दिवशी सकाळी लढाई केली. त्यांत एक मोठें गलबत व आठ फ्रिगेट होती; त्यांतून एक मोठें व तीन फ्रिगेट इतकी त्या दिवशींच धरिलीं, व आ- णखी तीन फ्रिगेट नंतर धरिलीं. या गलबतांत शिपाई व ऐरिश बंडवाले बहुत होते. त्या बंडवाल्यांत थिओवा- ल्ड वुल्फटोन या नांवाचा एक पुरुष जो पूर्वी पारीस शहरांत बंडवाल्यांचे कामावर होता, तोही सांपडला. त्यास ठार मारावे असे शासन ठरविलें, परंतु आत्महत्या रून तें त्यानें चुकविलें. नंतर ब्रिटिश राज्यावर चांगला हल्ला करण्यास आपणास सामर्थ्य नाही, असे पक्के समजून फ्रेंच सरकारानें इजिप्त देश घेण्याचा बेत केला. तो करण्याचे कारण है कीं, पुढे कधीं तरी आर्वस्थानाचे समुद्राचे वाटेने किंवा इरा- णा॒चे समुद्राचे वाटेनें हिंदुस्थानांत जावें अशी त्याची मस- लत होती. मे महिन्यांत जनरल बोनापार्ट व आड्म- रल ब्रुए हे दोघे सरदार मोठे अरमार घेऊन निघाले. त्यांनी जून महिन्याचे ९ वे तारिखेस माल्टा बेटा पुढे ये- ऊन तें घेतलें, व जुलै महिन्याचे पहिले तारिखेस त्यांची फौज आलेक्सांद्रिया शहरांत उतरली. तेथील लोक व तुर्क यांशीं कित्येक लढायांत फ्रेंच यांनी जय मिळवि- ल्यामुळे त्यांस हुशारी आली; आणि इजिप्त खचित आ पले हस्तगत होईल, असा त्यांचा निश्चय झाला. इतक्यांत