पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्त्रेट, व दुसरे जे लोक कायद्याप्रमाणे वहिवाट चालवि णारे होते, त्यांचे जिवावरची भयंकर मसलत केली होती; परंतु वंडवाल्यांची तयारी मोडण्याचा सरकाराने हुकूम केला, व दुसरा बंदोबस्त केला, त्यामुळे तें बंड शांत झालें. पुनः संन् १७९७ चे अखेरीचे पूर्वी ती दंडाची मसलत उभारली; आणि तींत मुख्य आर्थर ओकानर, ज्यास मेडस्टोन एथे सोडले होतें तो, व लार्ड एड्वर्ड फिट्स- अरल्ड हे दोघे होते. त्यांनी फ्रेंच यास मदत पाठवि- ण्याकरितां बहुत वेळ विनंती केली, आणि ती मदत आल्या- वांचून त्यांनी चढाव केला नसता; परंतु सरकारानें चां गला बंदोबस्त आरंभिला, त्यामुळे त्यांस एकदांच चढून यावें, किंवा बेत सोडून द्यावा असे प्राप्त झाले. त्या बंडांत जे होते, त्यांस क्षमा होईल, अशी जाहिरात लाविली ह्मणून पूर्वी लिहिले, त्याप्रमाणे लोक त्या करारास राजी होत असतां, आगस्त महिन्याचे १२ वे तारिखेस सु- मारें एक हजार फ्रेंच लोक गलबतांतून येऊन किलाला एथें उतरले. त्यास तेथील लोक थोडेच सामील झाले; जमूं नयेत ह्मणून लार्ड लेफ्टनंट तो येण्याचे पूर्वी त्यांनीं क्यास्तल्वार एथे जनरल लेक याचे हाताखालचे राजाचे फौजेवर हल्ला केला, आणि त्यास तेथून पळविलें. परंतु सप्तेंवर महिन्याचे ८ वे तारिखेस तो वालिंगमक एथें शत्रूंवर च ढून गेला, तेव्हां थोडीशी लढाई करून तें स्वाधीन झाले. इतक्यांत ते अधिक स्वतः तेथें आला. यामुळे ऐरिश लोकांचे जमावांतून बहुत ताबेखालीं आले, परंतु केव्हा केव्हां लूट व दांडगाई करणें हें चाल- लेच होतें. दिसेंबर महिन्याचे १६ वे तारिखेस एक S