पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जबरदस्त हल्ला करण्याचा निश्चय केला. परंतु सरकारानें चांगला बंदोबस्त केला होता, त्यामुळे त्यांचे कांहीं चाललें नाहीं; व त्यांचे मुख्यांतून कित्येक, ज्यांत लार्ड एडर्ड फि ट्स अरल्ड होता, त्यास धरून बंदीस घातले. त्याला धरा- वयाकरितां जे आले होते, त्यांशी लढाई करण्यांत त्यास फार जखमा लागल्या होत्या, त्यामुळे तो पुढे लागलाच मेला. तथापि त्याचे दुसरे दिवशी हजार भालेवाले व बंदुकवाले लोकांनी नास शहराजवळ राजाचे खारांवर हल्ला केला; परंतु त्यांचे निवारण चांगलें झाल्यामुळे त्यांतील शंभर सुमारें मारले जाऊन बाकीचे पळाले. त्या वेळेस दुसऱ्या कित्येक लढाया झाल्या, त्या सर्वांत बंडवाल्यांचा मोड झाला, तेव्हां अल क्याम्डन याचे जागेवर मार्कुइस कार्नवालिस यास अयर्लंड एथील लार्ड लेफ्टेनंट या कामावर पाठ- विलें. त्याने जाहीर केलें कीं, अमुक दिवसांचे पूर्वी के लेले अन्यायांची क्षमा, इनसाफाचा सुमार पाहून केली जाईल.' इतक्यांत अयर्लंड एथील कामन्स सभेनें बंडाचे बे- 'तांचा सर्व शोध लावून तें वर्तमान सविस्तर लिहून पाठविलें. तें असें. युनेटैड ऐरिशमेन याची मंडळी ह्मणून संन् १७९१ त झाली होती; तिचे प्रारंभापासून तिचे मुख्या- चा वास्तविक वेत हा होता कीं, अलर्यंड व इंग्लंड हीं दोन राज्ये वेगळी करावीं, व स्थापिलेली राज्य रीति फिर वावी. हा बेत त्यांनीं कांहीं वेळपर्यंत प्रसिद्ध केला नाहीं; शेवटीं फ्रेंच यांस कागद पत्र पाठवून त्यांनी त्यांची मदत मागितली, व फ्रेंच यांनी कबूल केली. संन् १७९६ त शस्त्रे व सामान त्या लोकांनी तयार करून जुरर, माजि-