पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ मामध्ये त्या बैठकीत जमीनीवरचा कर बंद करण्याचा उपाय कांही झाला. वर्षासाठी पैक्याचा एकंदर पुरावा झाल्यानंतर, राजानें सभेस निरोप पाठविला कीं, फ्रान्स, लांडर्स व हालंड या तीन देशांतील बंदरांत लढाईचें सामान व लोक यांची गल- बतावर चढण्याची तयारी मोठ्या हुशारीनें चालली आहे; व या देशांतील लुच्चे, व असंतुष्ट लोकांचे कागद पत्रांनी व निरोपांनी फ्रेंच यांचा हल्ल्याचा बेत वाढत आहे. या निरोपावरून पार्लमेंट सभेनें हेवियस कार्पस कायदा बंद करावा असे ठरविलें. नंतर आर्थर ओकानर ह्मणून एक ऐरिश गृहस्थ व दुसरे कित्येक लोक यांस शत्रूस कागद पत्र पाठवितात. या अन्यायावरून धरून, मेड्स्टोन एथें चौकशीकरून सोडिलें. ओकैली यावर मात्र गुन्हा लागू होऊन त्यास ठार मारिलें. पार्लमेंट सभेची बैठक जून महिन्याचे २९ वे तारिखेस संपली. लाहोग याजवळचे लहान सेंट मार्कुबेट इंग्लिश यांनीं घेऊन गलबतें वगैरे पहाण्याचे ठिकाण केले होते, त्यांवर फ्रेंच यांनी मे महिन्याचे ७ वे तारिखेस तोफांचे होड्यां- ची एक टोळी पाठविली, ती फार नाश पावून परत आली. इकडे ओस्तेंड एथील किला मोडण्याचा इंग्लिश यांनीं यत्न केला, तो फुकट गेला. असें वाहेरचें वर्तमान असतां अयर्लंड एथील हलके लोक सरकाराशीं नाराजी होते, त्यांस कित्येक मोठे लोक- ही सहाय झाल्यामुळे त्यांनी बंड करावयाची मसलत केली. यांस फ्रेंच मदत करणार होते, परंतु त्यांची वाट न पा हतां मे महिन्याचे २३ वे तारिखेस त्यांनी राजधानीवर