पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०३ न्यांत एक दिवस नेमिला, व त्या दिवशीं राजा व राणी पार्ल- मेंट यांतील सभासदांस बरोबर घेऊन सेंट पाल याचे देवळांत गेलीं. संन् १७९७ तब्रिटिश अरमाराचा जय झाला असतां- ही शत्रूंनी बाहेरून भय घालण्याचे उद्योग चालविलेच होते. जान्युआरी महिन्यांत पार्लमेंट सभा वसली, तेव्हां राजानें सांगितले की, आपले राज्यावर हल्ला करण्याचा उद्योग फ्रान्स देशांत चालला आहे, अशी मला बातमी लागली आहे; त्यावरून लढाईसाठीं पैका उत्पन्न करण्याकरितां तिप्पट कर बसवावयास हुकूम केला; या खेरीज कित्येक सभासद मागितल्यापेक्षां अधिक पैका देण्यास राजी झाले, व बांक याचे कारभाऱ्यांस इच्छेनें कोणी पैका दिल्यास घ्यावा ह्मणून हुकूम केला, तोही लवकरच पुष्कळ जमला. राजानें २०००० पौंड दिले, राणीने ५००० दिले; व दुसरे लहान लोक एकमेकाचे ईर्षेनें स्वदेशाचे कल्याणा- करितां पैका देऊ लागले. पार्लमेंट सभेत दुसरे ठरलें कीं, मिलिशिया यांचे कांहीं नवे लोक बोलवावे; आपले देशाचें संरक्षण करण्यास ज्यांस सामर्थ्य व इच्छा आहे, त्यांचा हिसाब आणवावा; व संकट पडल्यास त्यांपासून चाकरी घेण्यास राजास अख्त्यार द्यावा. असा विचार ठरल्यावर राज्यांत सगळे ठिकाणीं प्रतिष्ठित गृहस्थांनी एकी- कडे जमून आपलीं नांवें बालंटीर पलटणींत लिहिविलीं; आणि बरोबर कवाईत शिकून स्वदेशांतली बंडे मोडण्याची व बाहेरचा हल्ला निवारण करण्याची इच्छा धरून ते लव- करच त्या कामांत तयार झाले. जमाखर्चाचे दुसरे कल-