पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ आड्मरल डंकन ह्मणून टेक्सल नदीवरील इंग्लिश अरमाराचा सरदार आपले अरमार नीट करावयाकरितां तेथून गेला, ती संधी पाहून डच यांचे अरमार आपले ठिकाण सोडून निघालें. क्याण्टन वालप यानें हैं पाहून आड्मरल यास कळविले. तेव्हां आडमरल यानें आ पली मोठीं गलबतें चौदा, व दोन पन्नास तोफांची गलबतें, अशीं घेऊन जलदीनें त्यांवर चालून गेला. डच यांचा आड्मरल डेविटर यानें आपल्या हाताखालच्या पंध्रा गलव- तांची मोठ्या शौर्याने तयारी केली. नंतर कांपन गांव आहे, त्या कांठावर अक्टोबर महिन्याचे ११ वे तारिखेस लढाईचा प्रारंभ झाला. आड्मरल डंकन यानें शत्रूची रांग मोडावयाचे बेतानें त्यांच्या व जमिनीच्या मध्ये प्रवेश केला. प्रथम मागून वैस आड्मरल ओन्स्लो यानें हला करून फार पराक्रम केला. नंतर तो शूर आड्मरल डंकन यानें शत्रूची रांग फोडून त्यांची पुढली बाजू व मध्य यांवर जबरदस्त हल्ला केला. शेवटीं डेविंटर याचें गल- बतांचे रक्षण न होई, असे होऊन त्याने आपले निशाण उतारिलें. व त्याची नऊ मोठी गलबतें, व दोन पन्नास तोफांचीं, इंग्लिश यांचे हस्तगत झाली. त्या लढाईत ब्रिटिश अरमारांतले साडे सातशांवर लोक मेले, व जखमी झाले. तसेच शत्रूंचेही ५४० मेले व ६२० जखमी झाले. या विजयापासून लोकांस फारच संतोष झाला, व आड्म- रल डंकन यास बैलोट व आड्मरल ओन्स्लौ यास बा- रोनेट हे किताव मिळाले. लार्ड हो, व आड्मरल जर्विस, व डंकन यांनी तीन मोठे विजय संपादिले, तत्रि- मित्त सर्वांनी ईश्वराचा स्तव करण्याकरितां डिसेंबर महि-