पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५ आणि त्याने लिहिले होतें तसें केलें. त्याने त्या शिरच्छेद पत्रावर सही केली. मग किल्यावर अल याचा शिरच्छेद झाला. त्या वेळेसही त्यानें स्वस्थ मनानें आचरण केलें. पुढे राजाच्या मर्जीनें ज्या दोन अदालती स्थापिल्या होत्या, त्या मोडावयाचा उद्योग आरंभिला. त्यांची नांवें हैक- मिशन कोर्ट आणि स्तारचेंबर कोर्ट ही दोन्ही मोडावीं, आणि राजाची सत्ता बहुधा कमी करावी; असा हुकूम दोन्ही सभांच्या संमतानें ठरला. इंग्लंड देशांत असा भयंकर समय आला असतां अय- लँड एथील पोप मताचे लोकांस आशा उत्पन्न झाली की, या संधीस इंग्लिश लोक राज्यांतून नाही असे केले तर होईल. ह्मणून त्यांनी असा बेत केला की, एकदाच राज्यांतले सर्व प्राटेस्तंट मारून टाकावे. तसे त्यांनी करून सुमारें चाळीस हजार लोक ठार मारिले. त्या वेळेस वय, जाति, आणि स्थिति, यांपासून लोकांचे रक्षण झालें नाहीं. त्या अविचारी सर्व वधांत पूर्वीचा संबंध, उपकार- शक्ति, यांहींकरून बचाव झाला नाही. कितीएकांनी आपले स्नेही, कितीएकांनीं सोयरे, आणि कितीएकांनी आपले धनी मारिले. पळूनही लोक वांचले नाहींत; जे पळाले होते यांसही जिकडे तिकडे जाऊन धरिलें. या घोर कर्माचा आपल्यास तिरस्कार आहे असें रा- जानें सर्व प्रकारें दाखविलें, परंतु ते मोडावयास आपल्यास सामर्थ्य नाहीं, असे पाहून त्यानें पार्लमेंट सभेस द्रव्याचे पुराव्याविषयीं प्रार्थना केली; परंतु त्याची फार निराशा झाली; कारण पार्लमेंट सभेत असे ठरलें कीं, राजाने तें बंड वृद्धिंगत केलें, आणि राज्यांत मोठमोठी बंडे असतां