पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०१ - सुमारें पांच तास लढाई होऊन त्यानें शत्रूंचा पराजय के ला; व त्यांचीं दोन गलवतें ११२ तोफांचीं, एक चव- ज्यायशीं तोफांचें, व एक ७४ तोफांचें, अशीं चार घे- तलीं. तेव्हां असे कळून आले की, शत्रूंचे अरमारांत मोठी गलबतें २७ होतीं. ही लढाई फेब्रुअरी महिन्याचे १४ वे तारिखेस केप सेंटविन्सेंट याजवळ झाली, तीत इंग्लिश यांचे ३०० मेले; व सांपडलेले गलबतांत मेलेले व जखमी एकंदर आङ्मरल जर्विस याचे यादीप्रमाणें ६०३ होते. या विजयाचें इनाम ह्मणून आड्मरल यास अल सेंटविन्सेंट लार्ड जर्विस असा किताब दिला. पोथएथलारांत उन्हाळ्यामध्यें एक बंड पूर्वी सांगितले; तें बंड एक वेळ मोडल्यावर फिरून कांही दिवसपर्यंत तें त्यापेक्षां जबर झाले, परंतु शेव- टीं बंडवाल्यामध्यें आंतले आंत फूट पडून, त्यांतून बहुत आपले मुख्यांस धरून देऊन आपले कामावर हजीर झाले. • पार्लमेंट सभेचे मागले बैठकीचे वेळेस ठरले होते की, तहाचा फिरून उद्योग करण्याकरितां फ्रान्स एथे एक वकील पाठवावा. तह व्हावा ह्मणून लार्ड ग्रेन्विल यानें पत्र पाठविले, त्याचे उत्तर फ्रेंच यांनी चांगले रीतीचें केलें, व बोलणें लैल एथे व्हावे असे ठरलें. लार्ड मामस्वरी यास फिरून इंग्लिश यांकडचा वकील नेमिलें; व लेटु- नैर फ्रेंच यांकडचा नेमिला. तह होण्याचा प्रारंभ जुलै महिन्यांत झाला; परंतु फ्रान्स एथील राज्य चालविणा- रांनी अशी अपरिहार्य विनें केलीं कीं, तह कांहीं न होतां लार्ड मामस्वरी सतंबर महिन्यांत परत आला. यामुळे ● लोक फार कष्टी झाले.