पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० कीं, पूर्वीचे बैठकींत पैका देण्याचा हुकूम झाला आहे, त्या खेरीज या वर्षांत दुसरे एक कोटि पन्नास लक्ष पौंड गतील. उसनवार पैका एक कोटि पंचेचाळीस पौंड ला घ्यावा, व त्यांत पंध्रा लक्ष अयर्लंड याचे नांवावर लिहावा, असे पूर्वी ठरले होते. या खेरीज एंपरर यास आणखी अगाऊ पैका देणें झाल्यास पस्तीस लक्ष पौंड दुसरे उसने घ्यावे, असा करार केला. १२८४००० पौंड उत्पन्न करण्यास कांहीं जिनसांवर नवे कर बसविले. पुढे हे कर मना करून घोडे, कोळसे, मिरी, मोठीं व लहान घड्याळे, व स्काच दारु यांवर बसविले. ती सभेची बैठक जुलै महिन्याचे विसावे तारिखेस उठली. बैठकीचे शेवटीं प्रधानांत फेरफार करण्याचे वेत चालले होते; व अरमारांत एक मोठे बंड झाले होते, त्याचा बंदोबस्त करून त्यांतील मुख्यांस ठार मारिलें. त्या वेळेस सर जान जर्विस ह्मणून एक मोठा शूर इंग्लिश सरदार स्वनिश अरमार भेटेल या आशेनें समु द्रांत फिरत होता; शेवटी त्याचे बातमीदार गलवतांपासून त्यास कळले कीं, शत्रु बारा मैल अंतरावर दिसत आहेत. त्याचे अरमारांत मोठीं गलबतें पंध्रा होती, आणि शत्रूची पंचविसांत कमी नव्हती, असे दिसत होतें, तथापि त्यानें लढावयाच्या निश्चयानें आपले गलबतांचा बंदोबस्ताच्या रांगा करून स्पानिश अरमाराचा बंदोबस्त होण्याचे पू वींच त्यावर हल्ला केला. स्पानियार्ड यांशी लढाईचे प्रा- रंभी बहुत हिंमत पाहिजे असे समजून तो आपले लोकांचे भरंशानें नेहमीची पद्धति सोडून शत्रूंचे अरमाराचे मधून गेला, आणि त्याने त्याचा तिसरा हिसा वेगळा केला. नंतर