पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९९ असे ह्मणून, व आपला वकील पारीस शहरांतून घालवून देऊन मोडिला. डिसेंबर महिन्याचे ३० वे तारिखेस या निरोपाचा विचार झाला, व नेदर्लंड हे देश फ्रेंच यांचे हातीं न असण्याकरितां इतका आग्रह धरावा किंवा नाही, याविषयीं कित्येकांचें मत वेगळे होते, परंतु तहावि- षयीं राजाचे प्रधानांचें जें मत होते, त्यावर विरुद्ध छत्तीस मात्र संमति पडल्या. पार्लमेंट सभेची पुनः बैठक झाल्यावर तिचें लक्ष्य एके मोठे गोष्टीकडे लागले. ती गोष्ट ही, फेब्रुअरी इ०स० महिन्याचे २६ वे तारिखेस प्रिवि कौन्सिल १७९७ यानें हुकूम केला की, बांक याचे कारभान्यानीं राज्यां तील स्थितीचा विचार होण्याचे पूर्वी कांहीं पैका देऊ नये. या हुकुमाचें कारण कीं, सोनें रूपें मुलुखाचे बाहेर फार जाऊं लागल्यामुळे नाणे महाग झाले; आणि त्याविषयीं लोकांत गरज इतकी पडली की, बांक याच्या चित्र्या वि ४ कून पैका पाहिजे तर मिळावयास संकट पडूं लागले. २८ वे तारिखेस कामन्स सभेनें बांक याच्या काम कारभाराची चौकशी करण्याकरितां कमिटी नेमिली; तिनें त्यांचा जमा खर्च चांगले प्रकारचा आहे, असा रिपोर्ट केला; नंतर पैका देण्याची बंदी कांहीं वेळपर्यंत तशीच राखि- ली; परंतु दोन पौंड पर्यंत चिट्या देण्याचा अख्यार बांक यास दिला; व डालर या नांवाचें नाणे नवें पाडून चालविलें, त्यामुळे लोक स्वस्थ झाले; आणि जो अवि श्वास उत्पन्न झाला होता, तोही गेला. एप्रिल महिन्याचे २६ वे तारिखेस एक्सचेकर याचा चान्सेलर यानें दुसरी जमाखर्चाची याद देऊन कळविले २५