पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८ त्तर केलें कीं, सांप्रतचे कारभान्यांनी जर नेदर्लंड सो- डून दिलें, तर त्यांवर गुन्हा लागू होईल. रशिया, आ- स्त्रिया, व प्रशिया यांनी पोलंड देशचे विभाग करून आपले सामर्थ्य वाढविले.. इंग्लंड यानें मुलूख घेऊन आ- पलें सामर्थ्य दुप्पट वाढविलें, आणि आपले एकटे हिंदु- स्थानाचे राज्यानेंच युरोप एथील सर्व राज्यांस फ्रान्स देशावर आणण्याकरितां पैका देण्यास शक्ति आली, व व्यापार त्या एके देशाकडेच आहे, ह्मणून त्यास अपार द्रव्य मिळाले आहे. त्या भाषणामध्यें लार्ड माम्स्बरी यानें फ्रेंच वकिलास सांगितलें कीं, नेदर्लंड, फ्रान्स मुलुखाचा एक भाग असा वा, या गोष्टीस इंग्लिश राजा कधीं राजी होईल असे आ- पण मनांत आणूं नये. या भाषणाचे दुसरे दिवशीं लार्ड माम्स्वरी यास डरेक्टर यांकडून डेलाकोआ याचे हस्ते चिटी आली कीं, गुप्त चिटी सहीवांचून पाठविली तीवर सही करावी, व २४ तासांचे आंत आपला शेव- टचा करार सही करून पाठवून द्यावा. लार्ड साहेबाने चिटीवर सही केली; नंतर १९ वे तारिखेस डरेक्टर यांकडून त्यास १७ वेव १८ वे तारिखेचे त्याचे दोन चिट्यांचे उत्तर आलें कीं, फ्रेंच डरेक्टर राज्याची स्थि- ति, कायदे, व तह यांचे विरुद्ध कोणतें बोलणे ऐकणार नाहींत. लार्ड साहेबास दुसराही हुकूम झाला कीं, पारोस शहरांतून ४८ तासांचे आंत निघून जावें. नंतर राजाने कामन्स यांस निरोप पाठविला की, आ पला तहाचा उद्योग, फ्रेंच यांनी कबूल करावयास अयोग्य अशी मूळ कलमें धरिल्यावांचून आह्मी बोलणे ऐकत नाहीं.