पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एथील तहाप्रमाणे ब्रिटिश राजाजवळ आहे, तो सोडि ल्यास त्या देशांत मुलुखाची बरोबरी राखण्याकरितां तो दुसरें कांहीं तरी मागेल. पांचवें, या तहांत जीं ठिकाणे दिलीं व घेतली जातील, त्यांतील सर्व लोकांस आपले कु- टुंबासहित निघून जाण्यास, व आपली जमीन आणि स्था- वर जिनगी विकण्यास सदर परवानगी असावी. तशाच ज्या ज्या जप्ती केल्या असतील त्या रद्द करण्यासाठी, व दोहोंतून कोणते एके सरकारावर कोणी माणसाचा वाज- वी दावा असल्यास तो चुकविण्यासाठी बंदोबस्त व्हावा. नंतर दुसरी एक गुप्त याद दिली, तीत हालंड देशा- विषयी लिहिलें कीं, फ्रान्स देशानें लढाईचे पूर्वी जसे जसे होतें तसे जर सर्व विषयीं केलें नाहीं, तर ब्रिटिश राजा व त्याचे साथी यांचा त्या राज्यांशी फार संबंध आहे; ह्मणून राज्य देण्याघेण्याविषयीं मात्र त्याच्यानें रुकार देववत नाहीं, व स्पेन देशचे राजाविषयीं लिहिले होतें कीं, त्याची मर्जी तहांत मिळण्याची असल्यास आपणाकडून अडथळा नाहीं. या करारावर फ्रेंच वकिलाचें बोलणें पडलें, यांतील सारांश की, पहिल्या यादींत देण्यापेक्षां मागणे फार आहे, व त्याप्रमाणे दिले असतां फ्रान्स युरोपखंडांतील दुसरे सरकाराप्रमाणे बळकट राहाणार नाहीं. राज्याचे काय द्यांप्रमाणे त्या यादीतील करार कबूल करवत नाहीं; व ने- दर्लंड हे देश फ्रान्स यास मिळविले आहेत, ते सोडिले तर फार धांदल होईल. लार्ड मामस्वरी ह्मणाला, ब्रि- टिश राजा व एंपरर या दोघांमध्यें तह झाला को, लढाईचे पूर्वी दोघांचे जितकें राज्य होते तितकें परत आ- ल्यावांचून शस्त्रे ठेवू नये. यावर डेलाकोआ यानें उ ू