पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सांगितलें कीं, तहाचें कोणते बोलणे आह्मी अमान्य कर णार नाही, व लार्ड मामस्वरी यानें, दुसरे ग्रेट ब्रिटन याचे साथी राज्याकडून अख्यार आणिला. ह्मणजे त्यां- चे बोलण्यावर आह्मी लागलेच उत्तर देऊं. इंग्लिश वकील याकडून मध्ये एक पत्र गेल्यावर नवेंबर महिन्याचे १२ वे तारिखेस डेलाकोआ यानें इंग्लिश वकिलास लि- हून पाठविलें कीं, परस्पर काय करार असतील ते ला- गलेच लिहून पाठवावे. त्याच पत्रांत त्यानें कांहीं क्रोधा- चा अभिप्राय लिहिला, व त्यानंतर कांहीं कागद पत्रे झा- ल्यानंतर डिसेंबर महिन्याचे १७ वे तारिखेस इंग्लिश व किलानें देण्याचे व घेण्याचे करार, आणि परस्परें बंदो- बस्त हे लिहून एक गुप्त पत्र दिले. त्यांतील कलमें प्रथम, एंपरर याचें राज्य फ्रेंच यांनी घेतले असेल तें परत द्यावे. २ युरोप एथें साधारण निर्भयता असावी, असा जर्मनी एथील व फ्रान्स यांचा तह असावा. ३ फ्रेंच फौजेनें इटली देशांतून जावें, व त्या देशाचे आंतले कारभारांत पडणार नाही, असा करार करावा. दुसरे रशिया दे- शची एंप्रेस इनें मर्जीस येईल तेव्हां या तहांत यावें; व पोर्टुगल देशचे राणीचे मर्जीस येईल तेव्हां उभयपक्षी कांहीं जुलुमाचे करार न करितां फ्रेंच राज्याशी तिला तह क- रण्याचा अख्यार असावा. चवथें, या करारानें ब्रिटिश राजा, फ्रान्स मुलुखांतला जो भाग आपण घेतला आहे, तो सर्व तसाच परत देईल. तशींच सेंटपिएयर व मि - किलन ही बेटे व न्युफौंड्लंड एथील माशांच्या व्यापा- रांचा अखत्यार परत देईल; परंतु स्पानिश यांचें बंदर सेंटडोमिंगो, हे फ्रेंच यांस न देण्याचा अख्त्यार युत्रेक्ट