पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९५ कावा, * लिलावें, दारूवगैरे जिनसांवर २११०००० पौंड कर बसविले. परंतु पुढे उत्पन्न नाही किंवा त्यांपासून लोकांस दुःख होतें, ह्मणून रद्द केलें. यानंतर पार्लमेंट सभेनें तहाचे उद्योगाकडे लक्ष्य दिलें, त्या वकिलीचे कामावर लार्ड मामस्वरी याची नेमणूक होऊन तो अक्टोबर महिन्याचे १५ वे तारिखेस निघून गेला. त्या महिन्याचे २४ वे तारिखेस त्यानें डेलाक्रो- आ, फ्रेंच यांकडील वकील, यास एक चिटी पाठविली कीं, काईम तहाचा कांहीं तरी एक मूळ करार ठरवा. ही चिटी दिल्यावर प्रथम बोलणे झाले, त्यांत ब्रिटिश वकिलास विचारिलें कीं, दुसरे संस्थानाकडून तुह्मास करण्याचा अखत्यार दिला आहे की काय? त्यानें नाहीं ह्मटले; परंतु सांगितले की, माझें चिटीत लिहिले आहे, त्याविषयीं डरेक्टर यांचा अभिप्राय मला कळला; ह्मणजे मी ते वर्तमान सांगण्याकरितां व त्यांचे हुकूम घेण्याकरितां त्या संस्थानांत जासूद पाठवीन, तेव्हां इंग्लिश वकिलास विचारिलें कीं, फ्रेंच राज्याविषयीं व मुलूख परत देण्यावि- षयी ब्रिटिश सरकारचा काय विचार आहे, तो तरी तुह्मी सांगाल की नाहीं? त्यानें उत्तर केलें कीं, डरेक्टर यांनीं आपला अभिप्राय कळविल्यावर त्याविषयींही हुकूम आण- विण्याकरितां मी जासूद पाठवीन. डरेक्टर यांचे ह्म- णणे पडलें कीं, हें सर्व वेळ लावण्याचें लक्षण आहे; आणि असें बोलण्यावरून गेले वर्षाचे विखम साहेबाचे करार फिरून सांगणार असे आह्मास खचीत दिसतें. तहाचे मुख्य कलमाविषयींही त्यांची मान्यता नव्हती. परंतु त्यांनी

  • यास बुंहही झणतात. हा जिनस मुंबईमध्ये फार प्रसिद्ध आहे.