पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ सतंबर महिन्याचे २८ वे तारिखेस नवी पार्लमेंट सभा बसली. तेथें पहिला स्पीकर आडिंक्तन साहेब यासच त्या जागेवर नेमिलें. त्या बैठकीत राजानें सभेत भाषण केलें. त्यांत दुसऱ्या गोष्टींमध्ये हें जाणिवले की, तहाच्या बोलण्याचा उद्योग चालविला आहे, व सर्व अख्यार देऊन कोणास तरी लवकर पारीस शहरास पाठवितों. तसाच शत्रूंचा हल्ला करण्याचा उद्योग, आपले अरमाराचा विजय, शत्रूंचा पराजय, व लढाईचे प्रारंभी आस्त्रियन यांचा चढाव झाला तो, फ्रेंच यांनीं स्पेन देशास आपणाशीं लढाई करावयाची उमेद दिली आहे, या सर्व गोष्टीही सूचविल्या. अरमार ग्रेटब्रिटन किंवा अयर्लंड यांवर हल्ला करण्याचा श श्रूंचा बेत दिसत होता, ह्मणून प्रधानांनी मसलत सांगित- तली कीं, पंध्रा हजार लोक नवे ठेवून ते फौज यांत वाटावे; साठ हजार नवे मिलिशिया यांचे लोक जमवावे, व सुमारें वीस हजार स्वार, व बंदुकीचें निशाण मारण्यांत खबरदार असे सातशें, सगळे मिळून एक लक्ष दोन हजार. यानंतर थोडे दिवसांनीं पुराव्याचे विचारा- साठी सभेनें कमिटी केली, तेव्हां लढाई खात्याकडील सेकतारी याने जाहीर केले की, सांप्रत देशांत व बाहेर लढाईचे चाकरीवर एक लक्ष पंचाण्णव हजार सहाशें च- वन्याहात्तर लोक आहेत. डिसेंबर महिन्यांत प्रधानानें हिसाब दाखविला कीं, एकंदर खर्च २७६४७००० पौंड झाला, व वसूल २७९४५००० पौंड झाला ह्मणून, बाकी २९८००० पौंड राहिली. याखेरीज दुसरे चाहा,