पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९३ जमेका वेटांत होते, ते इंग्लिश यांनीं तें वेट घेतले तेव्हां त्यांचे ताबेखालीं न राहून स्वतंत्रपणाने वागत होते, त्यांशीं व इंग्लिश यांशीं संन् १७९५ चे अखेरीपासून लढाई चालली होती, ती संन् १७९६ चे मार्च महिन्यांत ते लोक अगदीं जिंकिले जाऊन संपली. त्यांनी मोठ्या शौ- र्यानें वीस लढाया केल्या, व त्यांस फ्रेंच यांनी डोमिनिका, ग्रिनाडा, व सेंटविन्सेंट या तीन ठिकांणीही बंडें उत्पन्न केली; परंतु तीं लागलींच नाहीं अशी केली. दुसराही मोठा अयर्लंड बेटावर येण्याचा फ्रेंचयांनी उद्योग केला, व तेथें लोक सरकाराशीं नाराजी असे दिसून आले होतें, ह्मणून ते आपणास मदत करितील, अशी फ्रेंच यांस आशा होती. डिसेंबर महिन्यांचे २६ वे तारिखेस सात मोठीं फ्रेंच गल- बतें वांत्रिवे या ठिकाणीं दृष्टीस पडली; परंतु वादळामुळे त्या गलबतांस जमीनीजवळ येतां आलें नाहीं. दैववशात् एक लेफ्टेनंट व दुसरे कित्येक लोक एके होडींतून तडीस लागले, त्यांस धरून कैद केले. त्यांनी सांगितले की, अयर्लंड बेटावर हल्ला करण्याकरितां कांहीं दिवसांपासून अरमाराची तयारी चालली आहे. त्या आरमारांत मोठी गलबतें सत्रा, व तिसांपेक्षा अधिक लहान आणि भाड्याची गलबतें, यांच्या तीन टोळ्या आडमरल डिगाल याचे हा ताखाली आहेत, व त्या गलबतांवर तिसांपासून पंचवीस हजारपर्यंत लोक आहेत, व त्यांचा सरदार जनरल दोश आहे. हे अरमार वादळानें मागें हटून परत ब्रेस्त व रा शेल या ठिकाणी गेले. त्यांतून एक पन्नास तोफांचे ब्रिटिश यांनी घेतले, व दोन चवन्याहात्तर तोफांचीं गल- तें वेस्त शहराजवळ तडीस लागून लुटलीं.