पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ एथील समुद्रांत शिरली. तेव्हां सर जार्ज कीथ एल्फि- न्स्तन याचे मोठें अरमार तेथें आलें, त्याची व त्या डच गलबतांची गांठ पडली; तेव्हां ती सगळीं धरून घेतलीं. तेव्हां डच यांचा सरदार लुकास ह्मणूं लागला की, ख लाशी लोक नाराजी ह्मणून हा अनर्थ घडला. दुसरे धाकट्या लढायांमध्ये लहान मोठी गलबतें फ्रेंच, स्पानि- यर्ड, व डच यांपासून इंग्लिश यांनी घेतली. इकडे इटली देशचे बाजूनें फ्रेंच यांनीं लढाई मोठे प्रतिष्ठेनें चालविली. तेथे त्यांचे फौजेचा सरदार बोना- पार्ट या नांवाचा कोणी एक कार्सिका वेटांत जन्मलेला असा होता. फ्रेंच व आस्त्रियन आणि फ्रेंच व इटली देशचीं संस्थाने यांच्या लढायांमध्ये खळ पडल्यावांचून संन् १७९७ चे एप्रिल पर्यंत चालल्या होत्या. त्यांचा विस्तार हा ग्रंथ लहान ह्मणून लिहीत नाहीं. सारांश, फ्रेंच वियेन्ना शहरच्या दरवाज्यापर्यंत येऊन पोचले, ते- व्हां ती लढाई संपली. जर्मनी एथील लहान राजाची फ्रेंच यांशी तहाची बोलणीं चालविलीं, व फ्रेंच यांनीं इटली देशांतील बहुतकरून सर्व संस्थाने जिंकून मनास येतील तसे तह करून घेतले. पुढे कोणते तरी रीतीनें सर्व इटली देशांतील जुने संस्थानांत फेरफार केले. याचें संस्थान मोडून त्याची फार स्वतंत्र राज्य केलीं. या विजयामुळे शत्रूस मेदितरेनियन समुद्रांत अंमल मिळाला, ह्मणून कार्सिका बेटांतील इंग्लिश गवर्नर यानें आपली फौज तेथून काढली. त्यामुळे तेथें राजनीति स्थापिली होती, ती मोडली. पोप स्पानिश गुलाम यांची संमति मारून नांवाचे लोक