पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ ह्मणून त्यांपासून राजास दुसरे कांहीं प्राप्त झाले नाहीं. त्यांचा द्वेष मात्र वाढत चालला. तो पैका काढावयाची जी रीति योजी, तीस ते कामन्स जुलूम, आणि कायद्यास विरुद्ध असे ठरवीत. ह्मणून राजाने त्या पार्लमेंट सभेस निरोप दिला; आणि पैका काढावयाचा कांहीं दुसरा उपाय करण्याचा निश्चय केला. तरी त्यास गरज होती ती संपेना; ह्मणून त्यानें फिरून पार्लमेंट याची नवी सभा नेमिली; जी राज्य रीतीचा नाश होईपर्यंत उठलीच नाहीं. त्या सभेनें त्याच वेळेस कामास लागून, जो पैका पाहिजे होता त्याचा विचार एकीकडे ठेवून राजाचा मुख्य प्रधान जो अर्ल स्त्राफर्ड यावर लार्ड सभेत दोष आणिला; त्याने शत्रूस कुंठित केले असतांही तो अपराधी ठरला, इतकें मात्र बाकी रा हिले होते की, राजाने त्या गुन्हेगारीचे पत्रास संमती द्यावी. चार्लस राजाची स्त्राफर्ड यावर फार प्रीति होती; ह्मणून त्याने त्याचे शिरच्छेद पत्रावर सही घालायास विलंब केला. राजाचें मन फार व्यग्र झाले, आणि पुढे काय करावें ते त्यास सुचेना; अशा समयीं तो अपराधी लार्ड यानें एक मोठ्या धीराचे कर्म केले, तेणेंकरून राजाची चिंता गेली. तें कर्म असें. त्याने राजास एक पत्र पाठवून कळविलें कीं, तुमची आणि प्रजांची एकी होत असल्यास माझा जीव गेला असतां चिंता नाहीं; मी मृत्यूस सिद्ध आहे; आणि एखाद्याचे मर्जीप्रमाणे गोष्ट केली असतां त्यास कांहीं दोष नाहीं. ही त्यानें उदार मनाची प्रचीति दाखविली, परंतु राजानें त्याप्रमाणे वर्तणूक केली नाहीं,