पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९१ हीँ ह्मणतां, यावरून तुमचे दरबारचे मनांत कांहीं कपट आहे असा संशय येतो. दुसरे डरेक्टर यांचें ह्मणणे कों, कायद्याप्रमाणे चालणे हा आमचा धर्म होय, ह्मणून या काळाचे कायद्यांप्रमाणे फ्रेंच मुलूख जितका आहे, त्यांतून कांहीं सोडून देण्याची मसलत आह्मी करणार नाहीं, किंवा कधीं ऐकणारही नाहीं. या बोलण्यावरून ती तहाची मसलत संपली, आणि ब्रिटिश वकिलानें एप्रिल महिन्याचे १० वे तारिखेस जाहीरनामा छापिला कीं, फ्रान्स एथील कायद्यांत जितकें राज्य आहे, तितकें सगळे फ्रान्स मुलु- खाचे तावेंत ठेवण्याचा वेत डरेक्टर यांनी जाहीर केला, व त्यास विरुद्ध कोणतें बोलणे ते बोलणार नाहीत, किंवा कधीही ऐकणार नाहीत. तर आतां लढाई चालविणें, हैच ब्रिटिश राज्यास योग्य आणि अवश्य आहे. युरोप खंडांत लढाई चालू झाल्यापासून इंग्लंड देशा- ची फौज शत्रूची बाहेर देशचीं संस्थानें घेणें, व त्यांचे अरमारांचा नाश करणे, या कामास लागली होती. ह्मणून मद्रास एथें एक अरमार तयार करून मोलका बेटांतील डच यांचे संस्थानांवर पाठविले. आणि ते आंबोयना बेटांत पोंचतांच तेथील गवर्नर व कौन्सिल यांनी तें स्वा- धीन केलें. बांडा ह्मणून दुसरें एक वेटही लवकर तसेंच त्यांचे हस्तगत झालें, व त्या दोन ठिकांणीं बहुत पैका व बहुत खजीना सांपडला. ब्रिटिश फौजेनें दक्षिण अमे- रिका देशांतील डच यांचीं संस्थानें डमरेरा व एसेक्कि- बो हीं घेतली. आगस्ट महिन्यांत डच यांचीं तीन मोठी व पांच लहान गलबतें व एक सामानाचें गलबत इतकी केप आफ गुड्होप यावर हल्ला करावयासाठी साल्डाना