पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९० सून फार मोठे काम झालें, व तुह्मी पहिल्यापासून तह हो- ण्याची आस्था दाखविलीत, व सर्व कृत्यें सारिखी चतुर- पणानें, स्वस्थचित्तानें, व स्थिरतेनें केलींत, यापासून मला सर्वकाळ संतोष होईल. दुसरे दिवशीं पार्लमेंट सभेस निरोप देऊन दुसरीस बोलावण्याकरितां जाहीरनामा लाविला. या सभेचे बैठकीत तहाविषयीं फ्रेंच यांचे मनांत काय आहे, हे पाहाण्याकरितां यत्न केला. तो असा. मार्च महिन्याचे ८ तारिखेस ब्रिटिश दरवारांतून विखम सा- हेबाचे हातून बार्थलमी साहेब फ्रेंच दरबारचा स्विस लोकांकडील वकील, यास ब्रिटिश सरकारानें एक चि टी पाठविली की, या पुढील तीन प्रश्नांची उत्तरे लिहून पाठवावीं. ते तीन प्रश्न हे. पहिला, पुढे जी जागा ने- मिली जाईल तेथें वकील पाठवू, व सर्वांच्या तहाचे बोलणें चालू करावयाची फ्रान्स देशांत इच्छा आहे की नाही? दूसरा, फ्रान्स देशाचे मर्जीप्रमाणे तहाचीं मूळ कलमें कोणतीं, हे सांगावयाचें मनांत आहे की नाहीं? की जीं कळली असतां ब्रिटिश राजा व त्याचे साथी मिळून ती तहाचीं मूळ कलमें उपयोगी पडतील किंवा नाहीं? हा वि चार करितील. तिसरा, तह होण्याची दुसरी कांहीं तरी मसलत करण्याची इच्छा आहे की नाहीं ? याचें उत्तर बार्थलमी साहेबानें कळविले कीं, मी आपली चिटी फ्रेंच सरकारचे डरेक्टर यांस पाठविलो, व त्यांनी मला कळविलें कीं, फ्रेंच राज्याचा वास्तवीक प्रतिष्ठेचा व मज- बूत तह व्हावा, अशी आमची इच्छा आहे; परंतु तुह्मी आपणास तह करण्याचा कांहीं हुकूम किंवा अख्यार ना-