पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८९ नवे कर बसविले; व सरकार वसुलाचे दुसरे खात्यांत फेर- फार केले. हे सर्व मिळून जमा ११२३००० पौंड होईल, असा अकार केला होता. डिसेंबर महिन्याचे ८ वे तारिखेस राजानें पार्लमेंट सभेस एक निरोप पाठविला. तो असा की, आपण व आ- पले स्नेही राजे यांचे हित साधून तह होतो, असें संधान आल्यास, शत्रूंचें तहाचें बोलणे लागलेच आपणास ऐकावें लागेल, अशी फ्रान्स देशाची सांप्रत स्थिति झाली आहे. या राजाचे निरोपावर पार्लमेंट सभेनें त्या वेळेस कांहीं वि- चाराचा आरंभ केला नाहीं.

  • फेब्रुअरी महिन्यांत विरुद्ध पक्षांतून कोणी कांहीं बोल-

ल्यावरून प्रधानानें सभेस सांगितले की, आपण व आपले मदतनीस यांनीं तह होण्याविषयीं फार प्रयत्न केला आहे. फ्रेंच हे जें बोलतील तें ऐकावयास सिद्धता आहे, आणि मर्जी असल्यास तहाचा प्रारंभ करण्यास भी तयार आहे. १ एप्रिल महिन्याचे ८ वे तारिखेस पिट साहेबानें वसूल व खर्च यांची दुसरी याद दिली कीं, मी मागली याद दिली, तेव्हां छापलेले कापसाचे कापडावर कर बसवून १३५००० पौंड वसूल उत्पन्न करावा, असा माझा वेत होता, परंतु आतां मला वाटतें कीं, तो रद्द करून कुत्रे, टोप्या, यांवर नवे कर बसवावे, व दारूवरचा कर वाढवावा, या सर्वांचा अकार त्यानें ७४०००० पौंड केला होता. जुलै महिन्याचे पांचवे तारिखेस पार्लमेंट सभेची बैठक उठली; व त्या वेळेस राजानें सांगितले की, राज्यांतील बंड व दांडगाई बंद होण्याकरितां तुह्मी बंदोबस्त केला, त्यापा- इ०स० १७९६