पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ अशाच सभा आलीकडे बहुत होत चालल्या आहेत. तर सर्व माजिस्ट यांस हुकूम कीं, अशी सभा होण्याची बातमी त्यांस कळली, ह्मणजे त्यांनी ती सभा होण्याचे ठि- काणीं स्वतः जाऊन ती सभा न होईल, याविषयी कायद्या- प्रमाणे यत्न करावा, व लोकांस घालवून द्यावें. तशा संकट समयीं या हुकुमापासून चांगला बंदोबस्त होणार नाही, असे समजून पार्लमेंट सभेत दोन कायदे ठरविण्याचा विचार निघाला. त्यांत एक राजाचे शरी- राचे चांगले संरक्षण होण्यासाठीं, व दुसरा, अशा दुष्ट स भा न व्हाव्या याविषयीं, चांगला बंदोबस्त राहाण्यासाठी या दोन कायद्यांतून शेवटच्याविषयीं सभेचे बाहेरचे लो- कांनी फार अडथळा केला. राज्यांत सर्व ठिकाणीं लो- कांच्या सभा होऊन पार्लमेंट सभेस अर्ध्या येऊं लागल्या, त्यांत त्या दोन कायद्यांस अनुकूळ अर्ज्या पासष्ट आल्या, व त्या देते वेळेस त्यांवर सह्या एकुणतीस हजार नऊशें बा- वीस होत्या; परंतु त्या कायद्यांस विरुद्ध अर्ज्या चवन्याण्णव आल्या; व त्यांवर सह्या एक लाख एकतीस हजार दो- नशे चवन्यायशी होत्या. तथापि ते दोनही कायदे पार्ल- मेंट सभेत बहुत अधिक संमति पडून मुकरर झाले. लढाई खात्याकडील सेक्रतारी यानें कळविलें कीं, वर्षांत लढाईकडे २०७००० फौज आहे. एक्सचेकर याचा चान्सेलर यानें सांगितले की, या वर्षांत राजास २७६६२०७२ पौंड इतके पैक्याचा पुरावा झाला. या खेरीज एक कोटि ऐशीं लक्ष उसनवार घेण्याचा करार ठरविला. वारिसदार यांचे हिशाची जिनगी, शोभेचे व मजूरदार घोड़े, व छापलेले कापसाचें कापड यांवर