पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८७ त्यांपासून ज्या गोष्टी पुढे घडणार, त्या उघड दिसत ना- हीत; परंतु जर त्यांपासून सर्व राज्याची स्वस्थता होई अ- सा तह होण्याची संधि आली, तर त्याविषयीं मी फार यत्न करीन. दुसरें त्यानें सांगितले कीं, युद्ध मोठ्या हुशारीनें चालविल्यास तह सहज घडून येईल, असे समजून वेस्ट इंडीस एथें अरमाराची खबरदारी ठेवून उमेदीने लढाई चालविण्याविषयों माझे प्रयत्न चालले आहेत. त्या दोन सभांस आणखी सांगितले की, जर्मनी आणि रशिया एथील दरबारांशीं संरक्षणाचा व अमेरिकन सर- काराशीं व्यापाराचा तह केला आहे. राजानें या पार्लमेंट सभेचे बैठकीचे प्रारंभी राजा लार्ड स मेस जात असतां वाटेनें वाड्यापुढील अरुंद जागेत यावर कोणीं गोळीसारिखें कांहीं मारिलें, व दुसरी दांडगाई के- ली. याविषयीं शायदीदार लार्ड व कामन्स या दोघांचे सर्भेत नेऊन चौकशी झाली. पुढे त्या दांडगाईंत जे लोक होते, त्यांस धरिल्यास एक हजार पौंड इनाम मि ळेल असा जाहीरनामा लाविला; परंतु त्यापासून कांहीं उपयोग झाला नाहीं. एक किड्वेक ह्मणून होता, त्यास राजाची हुर्यो केली, ह्मणून धरून ग्लास्तर बंदिखान्यांत पांच वर्षे कैदेत ठेविलें. पुढें नवेंबर महिन्याचे ४ थे तारिखेस दुसरा जाहीरना- मा लाविला, व लार्ड सभेपुढे जाहीर केला. तो असा की, राजाचे शरीरावर दांडगाई झाली, त्याचे पूर्वदिवशीं लंडन शहराजवळ कोपेन्हेगेन् हौस या वाड्यांत एक सभा झाली, तीत कित्येक लोकांनी दांडगाईचीं, हलकी, आणि लबाडीचीं भाषणे केलीं; त्यामुळे ती दांडगाई झाली; व २४