पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ वहिवाट चालवावी, व त्या पांचांतून प्रतिवर्षी एकएकानें आपली जागा सोडावी, असे केलें. चारशें असामी एप्रील महिन्याचे २३ वे तारिखेस वारनहेस्तिग्झ साहेबाचे अन्यायाविषयींचा निश्चय वेस्तमिन्स्तर हाल यांत ठरला. तेथें त्या वेळेस कामन्स सभेतील सुमारें होते, परंतु लार्ड यांतून एकुण- तीस मात्र आले होते. तितक्यांच्याच मनांत संमति द्या- वयाची होती. अपराधाचे पहिले कलमावर अर्ल राड्नर सफक, फित्सविलियम, आणि काअर्नार्वन, तसेच ड्युक नार्फक व लार्ड चान्सेलर यांनी त्यावर गुन्हा लागू झाला असें ह्मटलें; परंतु दुसरे तेवीस लार्ड यांनी त्यास निरापराधी ह्मटले. दुसरे तेवीस कलमांवर त्यांची संमतें बहुतकरून अशीच पडली. सोळा कलमांचा कोर्ट यानें असा विचार केल्यावर, हेस्टिंग्झ साहेबास आंत बोलावून लार्ड चान्सेलर यानें सागितलेकी, कामन्स यांनी तुह्मांवर जे आरोप ठेविले होते, ते तुह्मावरचे दूर झाले, आणि तु- ह्मी आपला खर्चवेच दिला, ह्मणजे तुह्मास मोकळीक मि- ळेल; ही स्मरण राहावयाजोगी चौकशी सन १७८८ चे फेब्रुअरी महिन्याचे १२ वे तारिखेस चालू झाली होती; परंतु मध्ये काम बंद झाल्यामुळे इतका काळ गेला कीं, तितक्या वर्षांमध्ये १४९ दिवस मात्र काम चाललें. फिरून अकटोबर महिन्याचे २९ वे तारिखेस पार्लमेंट सभा एकत्र झाली. तेव्हां राजानें दोनही सभांस सांगि- तलें कीं, या वर्षांत राज्याची स्थिति फार चांगले रूपास आली, हे पाहून मला मोठा संतोष झाला; व फार दिवसां- पासून फ्रान्स देशांत बंड व प्रजांची सत्ताहीं चालली आहेत,