पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८५ मुळे ते सर्व मेले गेले. कित्येक सांपडून वंदीत पडले, त्यांतून नऊशे मात्र बाकी राहिले, ते व त्यांस मिळालेले राजपक्षाचे लोक सुमारें १५०० इतके मिळून अरमांरा- वरून जाऊन वांचले. तेथें गेलेले लोकांतून जे सांपडले होतं, त्यांस चौकशी करून ठार मारिलें. समुद्रामध्ये अजूनही ब्रिटिश अरमाराचा इतरांपेक्षां श्रेष्ठपणा तसाच होता. जून महिन्याचे २३ वे तारिखेस लार्ड ब्रिडपोर्ट यानें आपले हाताखालचें अरमार घेऊन पोर्टलोय एथें फ्रेंच यांचें अरमार होतें, त्यावर हला केला. त्या दिवशी सकाळी पुढलीं गलबतें शत्रूजवळ जा- ऊन लढाई सुरू झाली; ती नऊ वाजेपर्यंत चालली. तींत ब्रिटिश यांचा जय झाला. केप गुडहोप व सिंहल बे- टांतील त्रिंकोमाली शहर हीं ब्रिटिश सरकारास मि ळाली. मेदितरेनियन समुद्रांतही आड्मरल होथम याचे हाताखालचे अरमाराची व फ्रेंच अरमाराची लढाई होऊन, फ्रेंच यांची मोठी गलबतें दोन घेतलीं, परंतु त्या वेळेस इंग्लिश यांचेही एक मोठें गलबत धरिलें गेलें. फ्रेंच यांनी या वर्षांत दुसरीही कित्येक सरकारी व सावकारी गलबतें घेतली. त्यांनी सर्वसत्ताक राज्याचे पक्षासही व हुत लोक अनुकूळ करून घेतले. त्यांनीं स्पेन देशचे दरबाराशी तह केला होता, त्याखेरीज डच, टस्कनी, हे- सीकासेल, हानोवर आणि बर्लिन एथील दरबारांशी स्नेहभावानें तह केले. या वर्षी त्यांनीं राज्यरीतिही बद- लली, ती अशी की, एकींत दोनशे पन्नास सभासद, व दुसरीत पांचशे अशा दोन सभांनी राज्याचा सर्व विचार ठरवावा; आणि नेमलेले पांच असामींनी त्या विचाराप्रमाणे 1