पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ वासुद्धां इंग्लंड देशांत आला, तेथें हाप्तन कोर्ट या नां- वाचा वाडा त्यास रहावयास राजानें उदारपणानें दिला. नंतर फ्रेंच राज्याप्रमाणे डच लोक आपले राज्य करण्या- ची तजवीज करूं लागले, आणि त्यांनी या लोकांशीं शत्रू- पासून आपले रक्षण करण्याचा, व शत्रूचे नाशाविषयों मदत करण्याचा तह केला; परंतु फ्रेंच यांनी तेव्हांपासून त्यांस स्वतंत्र लोक असें न समजतां आपले ताबेदार असे वागविलें. वाल्मोडन याचे पराजयांत जी ब्रिटिश फौज वांचली होती, ती अतिशय संकटें व अडचणी भोगून इंग्लंड देशास परत आली. तथापि या लढाईच्या शेवटीं आस्त्रियन यांनी फ्रेंच लोकांस रैन नदी उतरून माघारें जावयास लाविलें; आणि मेन्स शहर बळकट वाटत होतें, तेही जबरदस्तीने घेतलें. या प्रसंगी एकशें सहा तोफा, दोनशें सामानाच्या गाड्या आणि दोन हजार बंदिवान इतकी आस्त्रियन लोकांचे हातीं सांपडलीं. मग लवकरच मान्हीम शहर त्यांचे स्वाधीन झालें; आणि डिसेंबर महिन्याचे अखेरीस असा ठराव झाला, की तीन महिनेपर्यंत उभयपक्षीं तह असावा. तितक्यांत दोघांकडून मोठे एके लढाईची तयारी झाली. इकडे फ्रेंच यांनीं स्पानिश राज्यांत शिरून त्यांस मोठे तहांतून फोडिलें. स्पानिश दरबारानें भिऊन आगस्ट महिन्यांत फ्रेंच यांशी तह केला. ब्रिटिश सर- काराने फ्रान्स देशांतून पळून आलेले लोकांतून सुमारे सात हजार पगार देऊन ठेविले होते, त्यांस तेथील बंडवाल्यांस मदत करावयास पाठविले; परंतु जुलै महिन्याचे २१ ता- रिखेस प्रजापक्षाचे लोकांनी त्यांवर अकस्मात् हल्ला केल्या-