पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८३ फडशा होणार नाहीं. त्याने सांगितले की, राजपुत्रास कार्नवाल प्रांताचे उत्पन्नावांचून १२५००० पौंड नेम- णूक करावी. यावर फार विरुद्ध बोलणें होऊन शेवटीं त्याप्रमाणे ठरलें. मग त्याचे नेमणुकीचे एक भागाच्या खर्चवेचाची चौकशी करण्याकरितां कित्येक कमिशनर नेमिले. जून महिन्याचे २७ वे तारिखेस पार्लमेंट सभेस पुढे सभा होई तोपर्यंत निरोप दिला. पूर्वी सांगितले की, हिवाळा फार यामुळे हालंड देशां- तले नद्यांचे पाणी थिजलें, ह्मणून जनरल पियु याचे आशेखालीं जी फ्रेंच फौज होती, तिला त्या देशांत जाव- यास सोपें पडलें. फ्रीझलंड एथील संस्थानांनी इंग्लंड देशाशीं एक मत होतें, तें सोडून फ्रेंच सरकाराशी तह केला. जान्युआरी महिन्याचे दाहावे तारिखेस ७०००० फ्रेंच फौज वाआल नदी उतरून पलीकडे गेली; आणि तिनें, ड्युक आफ यार्क गेल्यानंतर फौजेच्या सरदारपणा- वर जनरल वाल्मोडन ह्मणून होता त्यावर हल्ला केला. त्याचा सर्वत्र पराजय झाला. त्यास अटकाव होईना असें झाले, ह्मणून युत्रेस्ट, राटर्डम, या शहरांनी फ्रेंच लो- कांस आपले दरवाजे उघडले. पुढे फ्रेंच यांनी लवक- रच सर्व हालंड देश घेतला. फ्रेंच, वाआल नदी उत रून आलीकडे आले, अशी बातमी समजतांच स्टाट् हो- ल्डर यानें पळून जितकी संपत्ति सांपडली, तितकीचा बचाव केला. तो दैववशात् एक लहान गलबतावरून जाऊन वांचला. तें गलबत एकुणिसावे तारिखेस हांका- रलें, आणि कांही अडचण सोसून शेवटीं तो आपले कुटुं