पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ केलें; अमेरिका देशाशी मैत्री, व्यापार, आणि गलबतें चालविणे, यांसंबंधी तह केला; आणि आपला मुलगा प्रिन्स आफ वेल्स याचें व प्रिन्स आफ बस्विक याची मुलगी क्यारोलिन इशी लग्नाचा करार झाला आहे. लढाई चालविण्यासाठी जर्मनी देशचा एंपरर यानें दोन लक्ष लोक पाठवावे, ह्मणून त्याचे मदती- साठीं साठ लक्ष पौंड उत्पन्न करण्याचा विचार ठरविला. ब्रिटिश अरमारासाठी एक लक्ष मा णसे ठेवावीं, असा निश्चय ठरविला. या वर्षी एकंदर नेम- णूक दोन कोटि एक्यायशीं लक्ष अठ्ठावीस हजार झाली. याखेरीज एक लक्ष ऐशी हजार पौंड उसने घेण्याची पर- माणगी दिली, आणि दारू, चाहा, वगैरे जिनसांवर कर बसविले. इ०स० १७७७ बुधवारी एप्रिल महिन्याचे ८ वे तारिखेस राजाचा मुलगा प्रिन्स आफ वेल्स याचें प्रिन्सेस आफ बनस्विक याची चुलत बहीण इशीं लग्न झालें; आणि सत्ताविसावे तारिखेस दोनही पार्लमेंट सभांस राजपुत्राचे कर्जाबाबद निरोप पाठविला, आणि सांगितले की, त्याची नेमणूक वा- ढवावी. त्या निरोपाचें तात्पर्य हें होतें कीं, राजपुत्राचें कर्ज थोडे थोडें कार्नवाल प्रांताचे उत्पन्नांतून, आणि त्याचे घरखर्चावावद जी अधिक नेमणूक होईल तिचे बाकींतून फेडावें. या बाबद हुकुमाचा विचार होऊं लागला, तेव्हां फार वाद झाला. पिट साहेबाने सांगि तले की, राजपुत्राचें कर्ज साहा लक्ष आणि सात लक्ष पौंड याचे मध्ये आहे, आणि राजाचे नेमणुकींतून फार खर्च करणें प्राप्त झाले आहे; ह्मणून त्यांतून त्याचा कांहीं