पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३ करावयाचा उद्योग आरंभिला. तेथेंही लोकांस त्याचा बहुतकरून तिरस्कार होता. त्यानें असा हुकूम केला की, एडिंबर्ग शहरांतले मुख्य देवळांत लिटर्जी वाचावे. हा हुकूम पाहून लोकांच्या मनांस फार संताप झाला. पूर्वीपासूनच त्या मुलखांतले लोकांचा राजाशी कपटभाव आंतून होताच; परंतु आतां तो बाहेर फुटला, सारे लोक बंडास सामील झाले, आणि स्काच लोकांनी मोठ्या संता- पानें युद्धाची तयारी केली. इतके झाले तरी आपला बेत मोडावा असे राजाचे मनांत येईना, आणि त्यास वाटत असे की, राजा असे एक वेळ नांव घेतलें, ह्मणजे लोक आपल्या स्वाधीन हो- तील. ह्मणून त्याने लढाई सोडून दिली; आणि त्यांशीं तह करूं लागला; उभयपक्षी लढाई बंद करावी असे ठर- विलें, आणि तह झाला; परंतु त्याप्रमाणें चालावे असे दोघांतून एकाच्याही मनांत नव्हते. तथापि फौज दूर करावी, अशी दोघांनीही कबुलात केली. पुढे पुष्कळ तंटा झाला, बहुत तहनामे होऊन गेले; आणि पुनः लढाईची सिद्धता झाली. राजास ही लढाई करणे जरूर झाले; ह्मणून त्याने पहिले सारिखी पैका काढावयाची मसलत आरंभिली. जहाजांचा कर, आणि दुसरे किती- एक कर लोकांवर वसविले; त्याने लोक फार दुःख पावूं लागले; परंतु तितकेंही पुरेना असे होऊन पार्लमेंट यांचे द्वारे पैका काढावा अशी मसलत ठरली. परंतु त्याच्यानें नवी कामन्स यांची सभा बोलाविली. स्काच लोक राजाचे शत्रु असे ह्मणवेना. कारण की, पार्लमेंट याचा विचार आणि त्यांचा विचार एकच होता.