पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८१ विला, त्यांत फार प्रतिष्ठा झाली. त्या वेळेस फ्रेंच यांचीं मोठी गलबतें सव्वीस आणि इंग्लिश यांचीं पंचवीस होतीं; फ्रेंच गलबतांतून सात घेतलीं, आणि बाकीच्यांतून बहु- तांची फार खराबी झाली. या जयप्रसंगी लोकांनी मोठे उत्साह केले. हिंदुस्थानांत फ्रेंच यांची पांडिचरी, चां- दिनगर, व माही, हीं गेलीं. तशीच ही लढाई होत असतां फ्रेंच यांचा स्पेन देशचे पश्चि- मेकडील शेवटापर्यंत फार विजय झाला. आणि त्यांचे दुसरे फौजेनें सर्व आस्त्रियन, नेदर्लंड, लांडूसी, कुएनाय, कोंड, आणि वोलेनशिएन, हीं परत घेतली. त्यांनी आस्तैद, ब्रसेल्स, घेंट आणि आंटवर्थ ही घेतली; आणि डिसेंबर महिन्यांत मोठ्या नद्या थिजल्या, ह्मणून त्यां- च्या फौजेनें रैन व वाआल या नद्या उतरून कित्येक लढाया करून सर्व हालंड देश घेतला. या वर्षी सरकार गुन्हेगाऱ्यांसाठी कित्येक लोकांच्या चौ कशा झाल्या. त्यांतून तिघांस चौकशी करून गुन्हा नाहीं ह्मणून सोडिलें, बाकीच्यांस चौकशी केल्यावांचून सोडिलें. डिसेंबर महिन्याचे ३० वे तारिखेस पार्लमेंट सभा दोनही मिळाल्या; त्या वेळेस राजानें सांगितले की, पूर्वीचे लढाईंत जरी निराशा आणि पराजय हीं झाली आहेत, तरी लढाई आरंभिली, ती आग्रहानें चालवावी, हे मला खचीत चांगले वाटते. त्यानें दुसरें सांगितले की, सांप्रतची संकटे पाहून स्टेट्सजनराल यानें फ्रान्स देशांत आतां लोकां- मध्यें जो पक्ष बळकट आहे, त्याशीं तहाचें बोलणे लाविलें आहे; आपण कार्सिका बेटांतले राज्य आणि प्रभुत्व कबूल