पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८० शहरांतील दप्तरें व कागद जप्त करण्याचा हुकूम केला, व हुकुमाप्रमाणे ते जप्त करून कामन्स सभेजवळ विचार करण्याकरितां पाठविले आहेत. त्या वेळी लंडन शहरां- तील कारिस्पाडिंग सोसैइटी ( कागद पत्राची मंडळी ) इचा सेक्रतारी हार्डी कन्सटिशनल सोसैइटी (रा- ज्यरीती मंडळी) इचा सेक्रतारी आडम्स, आणि हार्न टूक साहेब, जान थेलवाल, व जर्मैया जाय्स, यांस धरून सरकार गुन्हेगारीचा आरोप ठेवून किल्यांत बंदीस ठेविले. तसाच कायदा केला कीं, राजाचे शरीरावर किंवा राज्या- वर जे बंड करितील, त्यांस धरून कैद करावयास राजास अख्यार आहे. हा हुकूम संन् १७९५ चे फेब्रुअरी महि न्यापर्यंत काईम राहावा असे केले. ती बैठक जुलै महि न्याचे ११ वे तारिखेस उठली. या वर्षी एकत्र मिळालेले फौजेचे विजयाची अगदीं उलट झाली. एकत्र जमलेले सरकारांनीं पूर्वी जीं मकाणें मिळविली होतीं, तीं त्यांची गेलीं; आणि लावेंडी प्रांतांत एक भयंकर बंड झाले होते, त्यावर सर्व युरोप देशाचे डोळे लागले होते, तेंही मोडले गेले. यापासून फ्रान्स देशाचा फारच स्वार्थ झाला; परंतु या गोष्टीपासून झालेले दुःख दुसरे ठिकाणी ब्रिटिश फौज जय पावली, त्यामुळे कमी झाले. वेस्ट इंडीस देशांत पार्टिनिको, सेंट लुसी व गुआडालुप, हीं घेतली; आणि कार्सिका वेटांत त्रि- टिश यांचा जय होऊन तेथील लोक ब्रिटिश सरकाचे ताबेखाली राहाण्यास, व तें सरकार जी राज्यरीति स्थापील, ती मान्य करावयास कबूल झाले. परंतु लार्ड हो यानें जून महिन्याचे दुसरे तारिखेस फ्रेंच अरभारावर जय मिळ-