पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७९ कायदा केला कीं, जे व्यापारी पैकेदार, किंवा दुसरे ज्यांची जिनगी बाहेर देशांत असेल, त्यांनी आपला बाहेरचा पैका व व्यापाराचा जिनस याच्या यादी घ्याव्या. या काय- द्यापासून पुढे जें होणार तें बंद करण्याकरितां ब्रिटिश सरकाराने कायदा ठरविला कीं, आपले प्रजांतून कोणी फ्रान्स देशांत सांप्रतचे अंमलदारांचे राज्यांतर होणारे कोणाचें देणें असल्यास देऊ नये. फ्रेंच यांनीही ब्रिटन बेटावर हल्ला करण्याचें भय घा- तलें होतें, तें सिद्धीस न जावयाकरितां फौज जमवावया साठी सरकारचा सेकतारी यानें प्रांतोप्रांतीचे लार्ड लेफ्टे- नंट यांस पत्रे पाठविलीं; आणि आज्ञा केली कीं, बाहेरून शत्रूचा हल्ला आला, किंवा देशामध्यें आतले आंत दंगा झाला, तर कोणते रीतीचा उपाय करावा, याविषयों लो- कांचे मत काय आहे, हे पहावें, यामुळे राज्यांतील सर्व मोठे शहरांत सभा झाल्या; आणि पैक्याच्या टिपा केल्या. पुढे राजास फ्रेंच लोक चाकरीस ठेवावयाची आज्ञा असावी, ह्मणून एक कायदा ठरला. तशीच प्रशिया देशचे राजास मदत होण्याकरितां मोठी एक पैक्याची रकम · द्यावी असे ठरले. मे महिन्याचे १२ वे तारिखेस राजाचा सेकतारी यानें राजाचा निरोप पार्लमेंट सभेस कळविला कीं, लंडन शह- रांतील कित्येक मंडळ्यांनी देशांतील दुसरे ठिकाणच्या मंडळ्यांशी कागद पत्रे ठेवून वाईट वर्तणूक चालविली आहे, आणि ते पार्लमेंट सत्तेचे सभेचा तिरस्कार करून तिचे विरुद्ध दुसरी एक राज्यसभा करावयाचा बेत उघड करीत आहेत, अशी बातमी ऐकून त्या मंडळ्यांची लंडन