पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७७ यांतून फौज फितुर करण्याविषयीं यत्न केला. तो व्यर्थ गेल्या- नंतर तो इंग्लंड देशास आला. त्यास तेथून जावे ह्मणून लागलाच हुकूम झाला. कोंड आणि वोलेशिएन हीं दोन शहरे जमलेले फौजांचे स्वाधीन झाली. शेवटचें ड्युक यार्क याचे स्वाधीन झाले. त्याने पुढे उनकिर्क शहरावर हल्ला केला; परंतु तो सिद्धीस गेला नाहीं. तितक्यामध्ये इंग्लंड व स्पानिश अरमार यांचा टूलों बंदरांत प्रवेश झाला. तेथें लार्ड हूड यानें जाहीर नामा लाविला की, माझे वंदरामध्ये येण्याचे कारण है की, गलबतें, अरमाराचें सामान, आणि तोफखाना, हीं राजाचें राज्य होईपर्यंत आपण ठेवावीं, व मग त्याचे स्वाधीन करा- वीं, आतांटूलों यांत रखवालीसाठी वेगवेगळे देशचे १८००० लोक ठेविले होते. स्पेन, नेप्लस, सार्डिनिया, हीं रा- ज्येही फ्रेंच यांशी लढायासाठीं एकीकडे मिळाली, स्वी- डन, डेन्मार्क, टस्कनी आणि जिनोआ ही मात्र उदा. सीन राहिली. नवेंबर महिन्यामध्ये सर गिल्बर्ट एलियट, जनरल ओहारा आणि लार्ड हूड यांस टूलों बंदरों फ्रेंच राजपक्षी लोकांशी बोलण्याचे काम सांगितले; परंतु फ्रेंच यांनीं डिसेंबर महिन्याचे प्रारंभी टूलों शहर पुनः घेतले. आणि एकीकडे जमलेली फौज तेथून त्या महिन्याचे १८ वे तारिखेस निघाली. त्यापूर्वी तोफखाना, दारूखाना, नऊ मोठीं व कित्येक धाकटी लढाऊ गलबतें, आणि गोदीवर- चीं जहाजें जाळलीं. वेस्ट इंडीस देशांत ब्रिटिश फौ- जेची एक टोळी हिस्पानिओला बेटाचे ज्या भागांत फ्रेंच यांचा अमल होता, तेथें जाऊन उतरली. या लढाईचे वेळेस पारीस शहरांत फार निर्दय कसे