पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ढविणें मला जरूर आहे. हा वेत प्रथम कामन्स सभेत कांहीं विघ्न होऊन, शेवटीं दोनही सभांस मान्य झाला; आणि लढाईची मोठी निकराची तयारी करण्याचा प्रारंभ झाला. सर्व परदेशीलोकांस राज्यांतून जबरीने का- ढून टाकण्याचा हुकूम पार्लमेंट सभेत झाला; आणि धा न्य फ्रान्स देशांस पाठवावयाचें बंद केले; परंतु त्या दे- शाचे शत्रूंस पाठविण्याची मोकळीक ठेविली. शेवटी फ्रेंच दरवाराचा वकील शावेलिन साहेब यास थोडा अ वकाश देऊन निघून जाण्याचा हुकूम केला, आणि फ्रान्स व इंग्लंड या दोनही देशांत लढाईचे बेत होऊं लागले, त्यामुळे ऐक्य होण्याची निराशा झाल्यावर, कन्वेन्शन • यानें प्रतिज्ञा केली की, फ्रेंच सरकार व ब्रिटिश दरबार आणि हालंड देशचा स्टाट् होल्डर यांशी लढाई होणार. आतां ग्रेटब्रिटन, जर्मनी व प्रशिया यांच्या फौजा मिळून लढाई चालू झाली. फौज बाहेर देशी पाठविली, व राजाचा दुसरा मुलगा ड्युक यार्क याने स्वतः सरदारपणा पतकारिला. त्या लढाईत शेवटीं एकत्र जमलेले फौजेचा चढाव झाला. यांनीं जनरल मिरांडा याचे हाताखालचे फ्रेंच लोकांचा परा- जय केला; आणि मेस्लिक्ट एथील वेढा उठविला. जनरल . वालेन्स याचे लोकांचाही मोड झाला; आणि पुढे वालेन्स व मिरांडा यांचे फाटाफूट झालेले फौजेचा सरदारपणा जनरल डुमुरियर यानें केला. त्यावरही लवकरच प्रिन्स कोब आणि जनरल क्लेयर्फे यांनी हलाकरून त्यांचा टि- मों एथें पराभव केला; आणि फ्रेंच अंमलदार आपले बेतास अटकाव करूं लागले, असे पाहून त्याने आपली इ०स० १७९३