पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७५ हीं वर्तमानें ऐकून इंग्लंड देशांत चिंता उत्पन्न झाली. नेशनल कन्वेन्शन या सभेमध्यें हुकूम झाले, ते इंग्लंड देशाचे स्वस्थतेस प्रतिकूल, असे समजून प्रधानांनी लवकर डिसेंबर महिन्याचे १३ वे तारिखेस पार्लमेंट सभेस बो- लावणें केलें. याचे पूर्वी राजानें एक जाहिरनामा लावि- ला होता कीं, मे महिन्याचे २१ वे तारिखेस एक जाही- रनामा लागला असतांही, आजून राज्यांतील कित्येक ल बाड लोकांनी बाहेर देशचे लोकांशी मिळून कायदे व राज्यरीति मोडावयाविषयीं फार उद्योग चालविला आहे; आणि त्यामुळे बंद होऊन बंडे व दंगे होऊं आगले आहेत; ह्मणून राजाने राज्यांतील मिलिशिया यांचा कांहीं भाग जमवावा असा निश्चय केला आहे. या जाहीरनाम्यापासून फार भय उत्पन्न झालें, फौज लंडन शहराचे नजीक आ ली; वांक यावरचे रखवाली लोक दुप्पट केले, आणि लं- डन शहरचे किल्ल्याचे तट नीट केले. तशाच राज्यांत सर्व ठिकाणी सभा होऊन राज्य व राज्यरीति यांचे पक्षा- चीं स्तुतिपत्रे राजास येऊ लागली. पार्लमेंट सभेचे प्रारंभी राजानें भाषण केले, त्यांत क ळविलें कीं, फ्रान्स देशचे राजाचे वहिवाटीची तजवीज करणें जरूर आहे; कारण, तेथे चिन्हें अशीं दिसतात कीं, दुसरे देशांत दंगा करावा, जी सरकारें त्याविषयी उदा- सीन आहेत, त्यांचेही हक्क मनास आणूं नये, आणि आपले मित्र स्टेट्सजनरल यांजवळ सांप्रतचे तह मोडून राज्य- कायद्यांबाहेर वर्तणूक करावी. राजानें सांगितले की, अशा प्रसंगी आपले रक्षण होण्याचे उपाय कायद्याप्रमाणे माझे स्वाधीन आहेत ते करणे, व अरमार आणि फौज वा- २३