पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ क्रूरपणाने व हलकेपणानें कैद करून ठेविलें. मग प्रज- ची मोठी सभा सप्टेंबर महिन्याचे २१ वे तारिखेस एकी- कडे जमली; आणि तेथें लागलाच विचार ठरला कीं, राजसत्ताक राज्य मोडावे, आणि स्वतंत्र सर्व राज्य करावें. पुढले डिसेंबर महिन्यांत त्यांनीं हुकूम केला की, आपणा- पुढे राजाची चौकशी व्हावी. त्या सभेनें आपण राजा- वर आरोप ठेवून त्याची चौकशीही आपणच करून आणि शासनही आपणच ठरवून, त्याचा संन् १७९३ चे जा- नुआरी महिन्याचे २१ वे तारिखेस शिरच्छेद केला. हा राजा पदच्युत झाल्यापासून राज्यकर्त्यांवर अप्रीति, हा आ- रोप ठेवून बहुत लोकांस कैद केलें होतें; व सतंबर महि- न्याचे दुसरे तारिखेस बंदिखाना फोडून निर्दयपणानें कांही विचार न करितां त्यांचा जीव घेतला. दुसरा ज्या लो- कांविषयी शंका होती ते, बहुत हजार धर्मपक्षी; व मोठे लोक पळून गेले. त्यांतून बहुत इंग्लंड देशांत येऊन राहिले, आणि तेथें त्यांतून गरीबांचे उपजीविकेसाठी सर- कारांतून कांही नेमणूक झाली. अनेक वेळ जय पराजय होऊन त्या एकत्र झालेले फौजेवर फ्रेंच सैन्याने मान् याजवळ हल्ला केला, आणि खचीत जय मिळविला; आणि त्या वर्षाचे समाप्तीचे पूर्वी सर्व आस्त्रियन नेदर्लंड मुलूख लुक्सेंबर्ग व लिएज यांवाचून फ्रेंच लोकांचे ताबेखालीं आला. त्यांची फत्ते फार लवकर होत चालली, सामा- नाचा तोटा पडला, पावसाळा फार दिवस राहिला, व रशियन लोक फार मरूं लागले; या कारणामुळे शेवटी ते • फ्रान्स देशचे राज्यांतून निघून गेले, आणि त्यांचे मा- गून लवकर आस्त्रियन लोकांनींही तसेंच केलें.