पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७३ तत्क्षणीं विलंब न करितां मोकळीक द्यावी, आणि त्याच्या आज्ञा मानाव्या; न मानल्यास लढाईचे कायद्याप्रमाणे शि रच्छेद होईल; जर टिवलरीस वाड्यास कोणी जुलूम किंवा उपद्रव करील; जर कोणी राजास, राणीस, किंवा राजाचे कुटुंबांतून कोणा एकास, थोडा उपद्रव करील, आणि जर लागलींच त्या सर्वांस मोकळीक देऊन निर्भय रीतीनें ठेविली नाहींत, तर पारीस शहरा- चा लढाई होऊन अगदीं नाश होईल. केले कीं, राजा कैदेत असतां त्यानें दुसरें जाहीर जे केले ते रद्द असे. झाले. या जाहीरनाम्यापासून इच्छिल्याहून विपरीत फळ स्वतंत्र लोकांचे मनांत संशय आला कीं, कार- भारी लोकांनीं शत्रूशीं मिलाफ केला आहे. असा यांच्या मनांत संशय येण्यास कांहीं मोठा आधार नव्हता, परंतु त्यापासून त्या गरीब राजाचा घात झाला. संन् १७९२ चे आगस्ट महिन्यांत पारीस शहरचा मेयर तेथील कांहीं वकील बरोबर घेऊन नेशनल आसेंब्ली या सभेत आलात आणि राजास पदच्युत करावे असे ह्मणूं लागला. या बोलण्याचा विचार होण्याचे पूर्वी भयंकर बंड झालें; रा जाचे कुटुंबाची रहावयाची जागा टिवलरीस यावर हला येऊन पडला; स्विस रखवाली लोकांचा मोड करून त्यांस ठार मारिलें, आणि राजा व राजाचे कुटुंब हीं नेश- नल आसेंब्ली या सभेस शरण गेलीं. त्या सभेनें ला गलेच ठरविलें कीं, राजाजवळचा अधिकार बंद असावा, व सर्व लोकांची एक सभा व्हावी. राजा व त्याचें कुटुंब यांस पारीस शहरांत टेंप्ल या नांवाचे एके घरांत नेऊन