पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ ड्युक यानें प्रशिया व जर्मनी एथील सरकारांनी आप ल्या फौजा कोणत्या कारणासाठी एकत्र केल्या हैं लिहून कोन्लेन्स शहराहून फ्रान्स देशचे लोकांचे नांवानें एक प्रतिज्ञा प्रसिद्ध केली. ती अशी कीं, या कामासाठी आ पणास मदत होण्याकरितां, राज्यांतील शांत लोकांनीं (जे इतरांपेक्षा अधिक आहेत, असे त्याचे मनांत होते त्यांनीं) आपले जुलुमगारांचे उद्योगास आपण कबूल नाहीं, असे उघड बोलावें; दोन फौजांचा मुख्य सरदार भी सांगतों कीं, एकीकडे झालेले सरकारांचें लक्ष्य राज्य घेऊन आ पण द्रव्यवान होण्याचें नाहीं, परंतु फ्रान्स देशाचे क ल्याण व्हावें; राजा, त्याचे मनास चांगल्या वाटतील तशा सभा करण्याजोगा निर्भय व्हावा; आणि त्याने वचन दि ल्याप्रमाणें व आपल्या सामर्थ्याप्रमाणे आपले प्रजांचे कल्याण करावें, हीं त्या सरकारांची लक्ष्ये आहेत. एकीकडे जम लेले सैन्यास फ्रान्स देशांत येण्यास स्वतंत्र फ्रेंच फौजें- तून जे अटकाव करितील, ते हातीं शस्त्रे असून धरिले गेल्यास, शत्रूंप्रमाणे त्यांची अवस्था केली जाईल; व रा- जावर बंड करणारे आणि स्वस्थतेचे शत्रु ह्मणून शासन केले जाईल. चाकरीचे फ्रेंच फौजेसही मान्य होण्याचा हुकूम झाला, आणि न ऐकिल्यास आपले राजावर बंड केले ह्मणून शासन केले जाईल; आणि सर्व शहरांतले, खेड्यांतले, व प्रांतांतले लोक जे एकत्र जमलेले फौजेस वाटेने जातांना उपद्रव करितील, त्यांचा जीव घेऊन जि नगी लुटली जाईल, असें भय दाखविलें. पारीस शह- रचे अंमलदार व लोक यांस हुकूम केला कीं, राजास