पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ त्याचे धर्मापासून बेतानें वसूल उत्पन्न करूं लागले.. स्तारचेंबर या नावाचें राजानें स्थापिलेलें कोर्ट यांत कायद्यांचा संबंध न ठेवितां कितीएक निर्भय स्वतंत्र पुरु- षांची शासने झालीं. ते आपण दु:ख पावून, सरकारची दुष्कीर्ति होते, ह्मणून आनंद पावत असत. प्रिन ह्मणून बारिस्तर होता तो, बर्टन नामें एक धर्मोपदेशक, आणि वास्तविक या नांवाचा वैद्य होता तो, या तिघांची चौ- कशी होऊन असे ठरले की, त्यांनी इंग्लंड यांतोल धर्मपक्षाचे आचाराचे विरुद्ध लिहून त्यांनी प्रसिद्ध केले. ह्मणून त्यांस हे शासन मिळाले की, पिलरी यांत मान घालावी, कान कापावे, आणि पांच हजार पौंड दंड घ्यावा. गलबतांचा कर लोकांवर राजा बसवीत चालिला. बकिंगम प्रांतांत जान हांण्डेन ह्मणून संपत्तिवान् गृहस्थ होता तो हा कर देईना; आणि ह्मणूं लागला कीं, या गोष्टीची मी कोर्ट यांत चौकशी करणार. त्यास वीस शिलिंग कर द्यावयाचा लागणार होता, तो तितकेंही. देईना. मग इंग्लंड यांतले सर्व न्यायाधीशापुढे त्या गोष्टीविषयीं बारा दिवस वाद चालिला होता. ती गोष्ट ठरविली, ह्मगजे राजाची सत्ता खचित व्हावी असे होते; ह्मणून लोक वाट पहात होते की पुढे काय होतें. चार खेरीज करून बाकीचे सर्व न्यायाधीशांनी सरकारचे पक्षाचा हुकूम दिला. इकडे हांण्डेन हरला, परंतु लो- कांनी स्तुति केली, हा त्यास मोठा लाभ झाला. ● राजा चालिस इंग्लंड यांत धर्माध्यक्षांचें मुख्यत्व करूं लागला ते लोकांस आवडलें नाहीं, आणि त्यांनी त्यास अटकाव केला, तरी त्यानें तें स्काटलंड यांत चालू