पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागली. परंतु पुढले लढाईत पुरा जय झाला. संन् १७९२ चे फेब्रुवारी महिन्यांत पूर्वेकडची व पश्चिमेकडची फौज श्रीरंगपट्टणाच्या तटाखाली एकत्र मिळाली. सातवे तारि- खेस चांदण्यांत सुलतानाचे फौजेवर एक मोठा हला केला, त्यामुळे त्या शहरास अगदी चहुंकडून वेढा पडला. त्यामुळे टिपूनें तह करण्यासाठी लार्ड कार्नवालिस साहे- वाचे छावणीत एक वकील पाठविला; आणि तो या करा- रांवर कबूल केला. टिपूने एकीकडे मिळालेले सरका रांस आपले अर्धे राज्य द्यावें; लढाईचे खर्चाबद्दल तीन कोटि तीस लक्ष रुपये द्यावे; बंदिवान सोडावे; आणि तहांची कलमें पार पाडण्यासाठी, आपले दोन मुलगे ओ- लीस द्यावे. या कलमांवर मार्च महिन्याचे एकुणिसावे तारखेस टिपु सुलतान यानें सही करून तो तहनामा त्या ओलीस दिलेले राजपुत्रांचे हातून लार्ड कार्नवालिस साहे: बाचे हातीं दिला. ही लढाई फ्रेंच दरवारानें कावे करून उत्पन्न केली, असा तर्क होतो. त्या दरबारास असे वेत चालवावयास आतां सामर्थ्य राहिले नव्हते. जून महिन्याचे १५ वे तारिखेस पार्लमेंट सभा उठ ली; त्या वेळेस राजानें कळविले की, युरोप खंडांत लढा- ईचा प्रारंभ झाला ह्मणून आपणास फार चिंता लागली आहे. एप्रिल महिन्यामध्ये फ्रेंच लोकांनी जर्मनी देशचा एंपररयांशी लढाई करण्याची प्रतीज्ञा केली होती; आणि एंपरर व प्रशिया देशचा राजा या दोघांनी मिळून फ्रेंच सभेचीं कृत्ये चालू द्यावयाची नाहीं असा निश्चय केला होता. त्या दोन सरकारांच्या फौजा एकीकडे जमून त्यांचा सरदार ड्युक व्रस्विक लुनेन्वर्ग नेमिला. तो