पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० हला केला, व त्या आपले स्नेह्याचें रक्षण करावयास इंग्लि- शही त्याबरोबर मिळाले. मग लौकरच करनाटकाची मोठी फौज जनरल मेडोस साहेबाचे हाताखाली एकी- कडे जमली, आणि ती दक्षिण मुलुखांतून जाऊन लैसूर देशाची राजधानी श्रीरंगपट्टण यावर गेली. पश्चिमेचे बाजूनें मुंबईची फौज जनरल आवक्रांबी साहेबाचे हाता- खालीं कानानोर व समुद्रकांठावरची दुसरी कांहीं ठिकाणे घेऊन मैसूर राज्यांत गेली. टिपूसुलतानाने मोठ्या शौ- र्याने आपले रक्षण केलें, ह्मणून जनरल मेडोस साहेबास मद्रासेजवळ परत यावे लागले. पुढे मंन् १७९० चे डिसेंबर महिन्यांत गवर्नर जनरल लार्ड कार्नवालिस सा हेबाने आपण स्वतः सैन्याचा सरदारपणा मद्रासेचे पश्चि- मेकडील मुलुखांतून सरळ श्रीरंगपट्टणास एका- एकीं जावे असा निश्चय केला. मार्च महिन्याचे २१ वे तारिखेस मोठा किला बांग्लोर अकस्मात् हल्ला करून घेतला. त्या वेळेस इंग्लिश यांचा फार नाश इ०स० १७७१ झाला नाहीं. मे महिन्याचे १३ वे तारिखेस टिपूनें स्वतः राखलेले मैसूरचे राजधानीपासून दृष्टीचे टप्यावर येऊन फौज पोंचली. दुसरे दिवशीं लढाई झाली, तीमध्यें टिपूचा कांहीसा मोड झाला; परंतु कावेरी नदी (जीचे एके बेटांत श्रीरंगपट्टण आहे) तिला पूर आला, व सामानाचा तोटा पडला; यामुळे लार्ड कार्नवालिस साहेब यास परत बांग- लोरास जावे लागले, आणि जनरल आबक्रींबी यानें लार्ड कार्नवालिस साहेबाशीं मिळण्याचा बेत केला होता, त्या- लाही मोठ्या संकटानें व मानें आपली फौज परत न्यावी व